IMPIMP

Corona in India | चिंताजनक ! देशात मागील 24 तासांत 38,667 नवे बाधित, 478 जणांचा मृत्यू

by nagesh
corona in india | india reports 38667 new covid19 cases and 478 deaths

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Corona in India | मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या विषाणूने (Corona in India) जगभरात उद्रेक केला आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असल्याचे दिसते. तसेच गेल्या काही दिवसापासून भारतात (India) कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट पाहायला मिळाली. मात्र, आता कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ दिसून येत आहे. मागच्या आकड्याच्या तुलनेत सध्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तसेच, काही ठिकाणी कोरोनाची परिस्थिती चिंताजनक दिसत आहे. मृतांची संख्या (Corona death) देखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता आणखी एकदा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कोरोनाची संख्या (Corona virus)आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोना बाधित 38,667 सापडले.
दरम्यान, 478 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
तसेच, देशभरात आतापर्यंत 4,30,732 नागरिकांचा मृत्यू झालाय.
आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
आज (शनिवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38 हजारांहून जास्त नवे रुग्ण सापडले आहेत.
म्हणून देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल 3 कोटींवर गेली आहे.
तसेच मृतांची संख्या 4 लाख झालीय. आणि देशाचा पॉझिटिव्ही रेट 2.05 टक्क्यांवर आहे.
अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) दिली आहे.

भारतात कोरोना बाधितांपैकी 3,87,673 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच, 3,13,38,088 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
देशभरात आतापर्यंत तब्बल 53.61 कोटी लोकांचं कोरोना लसीकरण (Corona vaccination) केलं आहे.
तसेच, दरम्यान कोरोनाबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय.
चेन्नईत एक धार्मिक कार्यक्रम दरम्यान कोरोनाने हाहाकार केला आहे.
चेन्नईतील (Chennai) एका मंदिर उत्सवात भाग घेतलेले 20 जण कोरोना लागण झाली आहे.
या धार्मिक कार्यक्रमात साधारण 300 लोक सहभागी झाले होते.
यापैकी 47 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन (GSS) नेही पॉझिटिव्ह नागरिकांच्या संपर्कामध्ये आलेल्या नागरिकांना कोरोनाची टेस्ट करण्यास सांगितले आहे.
तसेच, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे नमुने 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी घेण्यात आले होते आणि काही दिवसात पुन्हा नमुने घेतील.
रिपोर्टनुसार संसर्ग नागरिकांची प्रकृती सध्या ठीक आहे.
त्याच्यावर ESI, KMC रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
असं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने (Administration) कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांवर नजर ठेवण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

Web Title : corona in india | india reports 38667 new covid19 cases and 478 deaths

हे देखील वाचा :

Partition Horrors Remembrance Day | 14 ऑगस्टला ’विभाजन भय स्मरण दिन’ साजरा केला जाईल, PM म्हणाले – ‘फाळणीच्या वेदना विसरता येऊ शकत नाहीत’

Covid19 Infection | भविष्यात कोरोनाविरूध्द लढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना दिले निर्देश, मुलांसाठी 20 टक्के बेड राहतील ‘राखीव’

Eta Variant of Covid-19 | नवं संकट ! कर्नाटकमध्ये समोर आला कोरोना व्हायरसचा ‘Eta व्हेरिएंट’, जाणून घ्या किती आहे धोकादायक

Related Posts