IMPIMP

Crude Oil Prices | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रभाव, LPG सिलेंडरपासून पेट्रोल-डिझेलपर्यंत होऊ शकते स्वस्त

by nagesh
LPG Gas Price | lpg-cylinder-prices-1-september-commercial-gas-reduced-from today

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Crude Oil Prices | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीं (petrol and diesel prices) मुळे त्रस्त झालेल्या सामान्य लोकांना एक मोठा दिलासा मिळण्याची आशा वाढली आहे. येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर पाच रुपये प्रति लीटरपर्यंत कमी होऊ शकतात. ऊर्जा तज्ज्ञांनुसार (energy experts) जागतिक स्थितीमुळे कच्चा तेलाच्या दरात (crude oil prices) झालेल्या मोठ्या घसरणीनंतर हा अंदाज वर्तवण्यात आला आहे (In the next few days, petrol and diesel prices may come down to Rs 5 per liter).

मात्र, हे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देणे सर्वस्वी केंद्र सरकारवर अवलंबून असेल, कारण कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुद्धा कच्चा तेलाचे दर प्रचंड घसरले होते, परंतु मोदी सरकार (Modi government) ने पेट्रोल-डिझेलचे दर कमी न करता स्थिर ठेवले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दर महिन्याच्या 1 तारखेला कमर्शियल आणि घरगुती सिलेंडरचे नवीन दर (commercial and domestic cylinders) जारी केले जातात. यावेळी 1 डिसेंबरला होणार्‍या पुनरावलोकनात पूर्ण शक्यता आहे की, सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात कमी होतील. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी झाल्या आहेत.

आयआयएफएल सिक्युरिटीजचे व्हाईस प्रेसीडेंट (करन्सी आणि एनर्जी रिसर्च) अनुज गुप्ता (Anuj Gupta, Vice President, Currency and Energy Research – IIFL Securities) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रोन (new variant of the corona virus, Omicron) हा डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य असण्याच्या वृत्तामुळे संपूर्ण जगात काळजी घेतली जात आहे.

यामुळे जगभरातील देश पुन्हा एकदा विमान प्रवासावर प्रतिबंधासह लॉकडाऊनचा आधार घेत आहेत. यामुळे शुक्रवारी कच्च्या तेलाचा दर एका दिवसात सुमारे 12 टक्के घसरून 72 डॉलर प्रति बॅरलपर्यत आला आहे. (Crude Oil Prices)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

जर येत्या काही दिवसात ओमिक्रोन (Omicron) चा धोका वाढला तर जगभरातील देश सक्ती वाढवतील.
ही सक्ती कच्च्या तेलाची मागणी कमी करण्याचे काम करेल.
तसेच, जागतिक दबावानंतर 2 डिसेंबरला होणार्‍या ओपेक देशांच्या बैठकीत कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो.

कच्च्या तेलाचा पुरवठा वाढणे आणि मागणी कमी झाल्याने किंमत कमी होणे नक्की आहे.
जर कच्चे तेल 72 डॉलरच्या जवळपास जरी राहिले तरी भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर पाच रुपयांपर्यंत कमी होतील.

किमतीत पाच ते सात टक्के कपात
ऊर्जा तज्ज्ञ नरेंद्र तनेजा (Energy expert Narendra Taneja) यांनी म्हटले की,
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत 10 टक्के घट झाली आहे.
कंपन्या पाच ते सात टक्के कपात येत्या 15 दिवसात करू शकतात.
अशावेळी पाच टक्के घट झाली आणि दिल्लीत पेट्रोल 103.97 रुपये प्रति लीटर असेल तर पाच रुपयांची कपात सहज होईल.

किंमत 15 दिवसाच्या ‘रोलिंग’ सरासरीच्या आधारवर
कच्च्या तेलातील जाणकारांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर किरकोळ किंमती 15 दिवसांच्या ‘रोलिंग’ सरासरीच्या आधारावर ठरवल्या जातात.
म्हणजे कच्चे तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये स्वच्छ होऊन पेट्रोल-डिझेलच्या रूपात बाजारात येण्यास सुमारे 15 दिवसांचा वेळ लागतो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अशावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमतीमधील घसरणीचा फायदा पुढील काही दिवसानंतर मिळेल.
तसेच, अलिकडेच अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियासह भारतासारख्या प्रमुख तेल ग्राहक देशाने
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती कमी करण्याच्या संयुक्त प्रयत्नांतर्गत आपल्या रणनिती साठ्यातून कच्चे तेल जारी करण्याची घोषणा केली होती.
याचाही परिणाम अजूनपर्यंत झालेला नाही. पुढे झाल्यास दिलासा मिळण्याची आशा आहे.

Web Title :- Crude Oil Prices | lpg cylender petrol diesel price will be down soon big impact of new variant of corona omicron on crude Oil Prices

हे देखील वाचा :

Pune Crime | कंपनीतून बेकायदेशीरपणे पैसे काढून देण्यास विरोध; कंपनी मालकाची बहिण, आई वडिलांनी केली महिलेची सोशल मिडियात बदनामी

Pune Crime | पुण्यात व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचा सपासप वार करुन खून; आंबेगाव बुुद्रुकमध्ये मध्यरात्री घडलेला प्रकार

Unified DCPR Maharashtra | खुशखबर ! 1 जानेवारी 2022 पासून राज्यभरात बांधकामांना ऑनलाईन परवानगी

Related Posts