IMPIMP

Dowry in Rural India | हुंडा देऊन झाले ग्रामीण भारतात 95% विवाह, डोळे उघडणारा जागतिक बँकेचा ‘हा’ अहवाल – स्टडी

by nagesh
Dowry in Rural India | study 95 marriages rural india took place giving dowry world bank report will open eyes

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाDowry in Rural India | हुंड्यासारख्या समाजातील कुप्रथा बंद झाल्या किंवा खुप कमी झाल्या आहेत असा कुणाचा समज झाला असेल तर तो गैरसमज आहे. कारण जागतिक बँकेला (World Bank) आपल्या एका संशोधनात आढळले आहे की मागील काही दशकात भारतातील ग्रामीण भागात (Dowry in Rural India) हुंड्याची प्रथा मोठ्या प्रमाणात स्थिर (dowry custom has stable) आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ही कुप्रथा पूर्णपणे नष्ट झालेली नाही ही चिंतेची बाब आहे कारण ही पद्धत रिवाजाप्रमाणे सुरू आहे. 1961 पासून भारतात ही प्रथा बेकायदेशीर घोषित केली आहे.

नवीन निष्कर्षावर पोहचण्यापूर्वी संशोधकांनी 1960 पासून 2008 पर्यंत ग्रामीण भारतात झालेल्या 40,000 विवाहांचा अभ्यास केला.
त्यांना आढळले की 95 टक्के विवाहांमध्ये हुंडा दिला-घेतला गेला.

भारताची बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण भागात राहात असल्याने स्टडीचा फोकस ग्रामीण भारतावर ठेवण्यात आला.
अर्थतज्ज्ञ एस. अनुकृती, निशीथ प्रकाश आणि सुंगोह क्वोन यांनी ’एकुण हुंड्या’चे मुल्यांकन केले.
यासाठी त्यांनी वधुंच्या कुटुंबियांकडून वर किंवा त्याच्या कुटुंबाला देण्यात आलेल्या भेटींची रक्कम आणि वराच्या कुटुंबांकडून वधुच्या कुटुंबांना देण्यात आलेली रक्कम यातील अंतर काढले.

संशोधकांना आढळले की, 1975 च्या अगोदर आणि 2000 च्यानंतर वराच्या कुटुंबियांनी वधूच्या कुटुंबियांसाठी भेटवस्तूंमध्ये सरासरी 5,000 रुपये खर्च केले.
तर वधूच्या कुटुंबियांकडून वराच्या कुटुंबियांना देण्यात आलेल्या भेटींची रक्कम याच्या सातपट जास्त होती.

2007 मध्ये ग्रामीण भारतात एकुण हुंडा वार्षिक घरगुती उत्पन्नाच्या 14% होता.
1950 आणि 1999 च्या दरम्यान भारतात दिलेल्या हुंड्याचे एकुण मुल्य जवळपास एक चतुर्थांश ट्रिलियन डॉलर होते.

Web Title : Dowry in Rural India | study 95 marriages rural india took place giving dowry world bank report will open eyes

हे देखील वाचा :

Buldhana RTO | मोटार वाहन निरीक्षक लाच घेतायत की दंड वसूल करतायत?

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 226 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Minister Nawab Malik | ‘केंद्राकडून राज्याला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत’

Related Posts