IMPIMP

Fake Currency | नोटबंदी कुचकामी ! देशभरात बनावट नोटांचा सुळसुळाट; प. बंगाल, युपी, गुजरात आघाडीवर तर महाराष्ट्रातही Fake नोटांचे प्रकार वाढले

by nagesh
Pune Crime | 35 lakh to a businessman in the camp area of pune under the lure of giving new series notes

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Fake Currency | बनावट चलन कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एका रात्रीत अचानक नोटबंदीसारखा निर्णय घेतला होता. परंतु बनावट चलन कमी झाले नसून ते आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. एनसीआरबीच्या (National Crime Records Bureau) ताज्या अहवालावरून हे उघड झाले आहे. या अहवालानुसार, 2020 मध्ये बनावट चलनाची (Fake Currency) सर्वाधिक प्रकरणे पश्चिम बंगालमध्ये नोंदली गेली आहेत. त्यानंतर यूपी आणि गुजरातचा नंबर लागतो.

2020 मध्ये प्रमाण वाढले

2020 मध्ये देशात एकूण 92.18 कोटी किमतीच्या 8 लाख 34 हजार 947 बनावट भारतीय चलन जप्त केले. 2019 पेक्षा प्रमाण 190.5 टक्क्यांनी जास्त आहे. 2019 मध्ये एकूण 2 लाख 87 हजार 404 बनावट भारतीय चलन जप्त केले होते. त्याचे मूल्य 25.39 कोटी रुपये होते. बनावट भारतीय चलनाची एकूण 385 प्रकरणे देशभरातील विविध पोलीस ठाण्यात नोंदली आहेत.

महाराष्ट्रात बनावट नोटांची 42 प्रकरणे

या अहवालानुसार, महाराष्ट्रात 2020 मध्ये पोलिसांनी 97 जणांकडून 83.61 कोटी रुपये मुल्याच्या 6 लाख 99 हजार 495 भारतीय बनावट नोटा जप्त केल्या. गेल्या वर्षी महाराष्ट्रात बनावट नोटा जप्त केल्याची 42 प्रकरणे नोंदली गेली.

कोणत्या राज्यात किती प्रकरणे

– पश्चिम बंगालमध्ये बनावट नोटा पकडल्याची सर्वाधिक 81 प्रकरणे घडली. यामध्ये 111 लोकांना अटक केली आणि 24 हजार 227 बनावट नोटा पकडल्या. ज्याचे एकुण मुल्य 2.46 कोटी होते.

– यूपीमध्ये 52 प्रकरणे नोंदली गेली. या कारवाईत 55 जणांच्या अटकेसह 17 हजार 78 बनावट नोटा जप्त केल्या. त्यांचे मुल्य 38.79 लाख रुपये होते.

– गुजरातमध्ये 23 प्रकरणांमध्ये 32 जणांना अटक झाली. 20 हजार 360 बनावट नोटा सापडल्या. त्यांचे मुल्य 87.96 लाख रुपये होते.

– मध्य प्रदेशात 5 प्रकरणांमध्ये 2 हजार 85 बनावट नोटा सापडल्या. त्यांची एकूण किंमत 2.02 लाख रुपये होती.

– दिल्लीत 4 प्रकरणांमध्ये 3 हजार 476 बनावट नोटा पकडल्या गेल्या. यांची एकूण किंमत 4.16 लाख रुपये होती.

– पंजाबमध्ये 95.80 लाख रुपये किमतीच्या 14 हजार 444 बनावट नोटा पकडण्यात आल्या.

– राजस्थानात 27.35 कोटी रुपये किमतीच्या 6 हजार 190 बनावट नोटा पकडल्या गेल्या.

– 2020 मध्ये देशभरात पकडलेल्या बनावट नोटांच्या प्रकरणांमध्ये एकूण 633 लोकांना अटक झाली. देशात एकूण 8 लाख 34 हजार 947 बनावट नोटा पकडल्या गेल्या.

किती रूपयाच्या किती नोटा पकडल्या

2020 मध्ये देशात एकूण 8 लाख 34 हजार 947 बनावट नोटा पकडल्या गेल्या. यामध्ये 2000 रुपयांच्या 2 लाख 44 हजार 834 नोटा,  नोटाबंदीपूर्वी 1000 रुपयांच्या 3 लाख 18 हजार 143 नोटा, जुन्या 500 रुपयांच्या 5 हजार 789 नोटा आणि नवीन 500 रुपयांच्या 2 लाख 9 हजार 685 बनावट नोटा पकडण्यात आल्या. त्याचप्रमाणे 200 रुपयांच्या 11 हजार 841 नोटा, 100 रुपयांच्या 33 हजार 443 आणि  50 रुपयांच्या 1589 नोटा, नवीन 50 रुपयांच्या 8599 नोटा, 20 रुपयांच्या 34 आणि 10 रुपयांच्या 990 बनावट नोटा जप्त केल्या.

प. बंगालमध्ये सर्वाधिक प्रकरणे

NCRB च्या ताज्या अहवालानुसार, 2020 मध्ये खझउ च्या कलम 231 ते 243, 255 आणि 489-अ ते 489-ए अंतर्गत एकूण 672 प्रकरणं नोंदवण्यात आली.  सर्वाधिक 109 प्रकरणं पश्चिम बंगालमध्ये, 63 आसाममध्ये आणि 55 उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आली. महाराष्ट्रात सुमारे 8 टक्के म्हणजेच 54 घटना घडल्या.

संबंधीत इतर गुन्हे

बनावट नाणी, बनावट सरकारी शिक्के, चलनी नोटा आणि बँक नोट्स बनावट करणे,
बनावट चलनी नोटा किंवा बँक नोट खर्‍या म्हणून वापरणे, बाळगणे अशा गुन्ह्यांसाठी उपकरणे बाळगणे,
लागणारे इतर साहित्य तयार करणे किंवा ठेवणे आणि चलनातील नोटा किंवा बँक नोटसारखी कागदपत्रे तयार
करणे किंवा वापरणे अशा गुन्ह्यांपैकी मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 49 गुन्हे, गुजरातमध्ये 27,
हरियाणामध्ये 18, पंजाबमध्ये 25 आणि दिल्लीमध्ये 32 गुन्हे दाखल झाले आहे.

Web Title :- Fake Currency | ncrb report fake notes worth rs 8361 crore were recovered in maharashtra in a year

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा :

USB Cable Private Part | ‘वाढीव’ काम करताना 15 वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगात अडकली USB केबल, करावे लागले ‘ऑपरेशन’

Pune Crime | गांजा तस्करी गुन्ह्यातील आरोपीचा जामीन दुसर्‍यांदा फेटाळला

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 80 रुग्णांचा मृत्यू, 3,841 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts