IMPIMP

Health Department Circular 2021 | उपचारात दिरंगाई होऊन मृत्यू झाल्यास डॉक्टरचं होईल निलंबन

by nagesh
Health Department Circular 2021 | suspension of doctor in case of patient death due to delay in treatment

सरकारसत्ता ऑनलाइनउपचारात दिरंगाई होऊन रुग्णाचा मृत्यू झाला तर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास निलंबित (Medical officer suspended) करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने (Health Department Circular 2021) घेतला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबतचे परिपत्रक (Health Department Circular 2021 ) जारी केले आहे. याची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना सर्व आरोग्य उपंसचालकांना देण्यात आल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

एका प्रकरणामध्ये छातीत दुखत असल्याने एक रुग्ण चालत रुग्णालयातील अपघात विभागात (Accident Department) गेला. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्याला अतिदक्षता विभागात पाठवले. मात्र, त्याठिकाणी बेड नसल्याने त्याला अन्य हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. त्याठिकाणी केसपेपरवील नोंदी नसल्याने त्याला पुन्हा बाह्य रुग्णलायात पाठवण्यात आले. या सर्व विभागात रुग्ण स्वत: चालत फिरत होता. यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सध्या विभागीय चौकशी (Inquiry) सुरु आहे. रुग्णाला वेळेवर उपचार मिळाले नाही, उपचारात दिरंगाई केल्याचा आरोप अनेकवेळा नातेवाईकांकडून केला जातो. यातून रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांना मारहाण होण्याचे प्रकार घडत असतात.

शासकीय आरोग्य केंद्र, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णावर, रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दिरंगाईमुळे रुग्ण एका विभागातून दुसऱ्या विभागात फिरत राहिला, दरम्यान त्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला असे निदर्शनास आले तर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला कर्तव्यात कसूर केल्याचा ठेवून तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम (Maharashtra Civil Service Act) 1979 मधील नियम 3 चा भंग केल्याबद्दलही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाने काढलेल्या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

म्हणून हा कठोर निर्णय

रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर देखील त्याला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला.
केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे रुग्ण दगावला.
वैद्यकीय उपचारात दिरंगाई होणे, केसपेपर अथवा त्यावरील नोंदी नसल्याच्या कारणाने रुग्णाला उपचार मिळत नसतील तर ते गैर आहे,
असे स्पष्ट करत या घटनेची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे.
अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत. याकरीता आरोग्य विभागाने हा कठोर निर्णय घेतला आहे.

Web Titel :- Health Department Circular 2021 | suspension of doctor in case of patient death due to delay in treatment

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis | ‘…तेव्हा काही लोकं मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात’ – अमृता फडणवीस

Crime News | गणेशोत्सवात बड्या बिल्डरच्या फार्महाऊसवर जुगाराचा टेबल ‘गरम’, 85 लाखाची रोकड जप्त तर 11 जण ताब्यात

T-20 World Cup 2021 | विराट कोहली कर्णधार पदावरुन ‘पायउतार’ होणार; रोहित शर्मा भारताचा कर्णधार?

Related Posts