IMPIMP

Home loan संबंधीत 11 गोष्टी ज्या जाणून घेणे आवश्यक, अन्यथा कॅन्सल होऊ शकते लोन अ‍ॅप्लिकेशन

by nagesh
Home Loan | what is pre emi vs full emi home loan property

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Home Loan | कर्ज देणार्‍या बँका आणि गृहकर्ज कंपन्या अनेक मापदंडावर अर्जदाराची पडताळणी करतात. कर्जावर (Home Loan) अवलंबित्व आणि पेमेंट हिस्ट्रीसह अर्जदाराची पात्रता, अनुभव, कुटुंबातील अलंबितांची संख्या इत्यादीचा यामध्ये समावेश असतो. यापैकी कोणताही मापदंड पूर्ण न झाल्यास अर्ज कॅन्सल होऊ शकतो. जाणून घेवूयात याबाबत :

1 डाऊन पेमेंट :

बँक प्रॉपर्टीच्या बाजार मूल्याच्या केवळ 80% कर्ज देते. (30 लाख रुपयांपेक्षा कमीच्या मूल्याच्या होम लोनच्या बाबतीत 90% पर्यत). इतर पैसे म्हणजे डाऊनपेमेंटची व्यवस्था तुम्हाला स्वताला करावी लागेल.

2 गॅरंटी :

काही बाबतीत बँक एखादी प्रॉपर्टी किंवा कारची गॅरंटी देण्यासाठी सांगू शकते. तुम्ही कर्जाची परतफेड केली नाही तर बँक प्रॉपर्टीवर कब्जा करू शकते. यासाठी बँकेला कधीही चुकीची माहिती देऊ नका.

3 क्रेडिट यूज :

जर तुमच्या नावावर जास्त कर्ज खाती असतील तर अशा स्थितीत होम लोनसाठी तुमचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता खुप कमी होते.

4 पेमेंट हिस्ट्री :

तुमची क्रेडिट आणि पेमेंट हिस्ट्री सांगते की, तुम्ही अगोदरचे व्यवहार कसे सांभाळले होते आणि तुम्ही कर्ज फेडण्यात किती सक्षम आहात. क्रेडिट हिस्ट्रीवर तुमचा क्रेडिट स्कोअर तयार केला जातो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

5 उत्पन्न :

किती होम लोन मिळेज, हे बर्‍यापैकी तुमच्या उत्पन्नावर ठरते. जेवढे उत्पन्न जास्त बँक तेवढे जास्त होम लोन देईल.

6 कार्ड अ‍ॅप्लीकेशन :

काही बँका एकाच वेळी अनेक नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणारे आर्थिक संकटात असल्याचा संकेत मानतात. मात्र, अनेक बँका मॉर्गेज लोन, कार लोन किंवा एज्युकेशन लोनसाठी केलेल्या अर्जांची चिंता करत नाही.

7 डॉक्यूमेंटेशन :

बँका तुमच्या सध्यस्थितीच्या बचत आणि सेवानिवृत्ती खात्यांची पडताळणी करण्यासाठी अलिकडील पेमेंट रिसिट मागते. बँकेचा हामी विभाग एखादी विसंगती किंवा कालावधी स्पष्ट करण्यासाठी तुमच्याशी संपर्क करू शकतो.

8 निवास :

जर तुम्ही घर घेण्यापूर्वी भाडेकरू होतात, तर बँक मागील घरमालकाशी संपर्काची माहिती मागू शकते.

9 वय :

होम लोन घेण्यासाठी पात्रता एका ठराविक कालावधीसाठी ठरवली जाते. कर्ज किती कालावधीसाठी मिळेल, हे तुमचे वय आणि एका ठराविक काळात कर्ज फेडण्याच्या क्षमतेवर ठरते.

10 अवलंबित :

तुमचे उत्पन्न इतके असावे की, अवलंबितांच्या गरजा पूर्ण करण्यासह होम लोनचे हप्ते सुद्धा वेळेवर फेडता येतील. बँक ठराविक जबाबदार्‍यांवरून उत्पन्न प्रमाणाची गणना करते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

11 पात्रता आणि अनुभव :

जर तुम्ही पगारदार आहात, तर होम लोनसाठी किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. जर बिझनेस करत असाल तर तुमची कंपनी किंवा युनिट मागील काही सालापासून सतत नफ्यात असावे. कंपनीच्या नावाने टॅक्स रिटर्न सुद्धा नियमित प्रकारे फाइल असणे आवश्यक आहे.

Web Title : Home Loan | home loan related important thing how to gate easy and chip home loan

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ED ची लुक आऊट नोटीस; ED ला वाटते देशमुख जातील परदेशात ‘पळून’

Rain in Maharashtra | येत्या 5 दिवसांत मुंबईसह पुण्यात ‘धो-धो’ पाऊस, नंदुरबार वगळता पावसाची राज्यात सर्वदूर बरसणार

Dhananjay Munde | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल, प्रचंड खळबळ

Related Posts