IMPIMP

IPS Saurabh Tripathi | निलंबित IPS अधिकारी सौरभ त्रिपाठीला न्यायालयाचा दणका; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
IPS Saurabh Tripathi | angadia extortion case dcp ips saurabh tripathi pre arrest bail application rejected

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन IPS Saurabh Tripathi | अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी वसुली प्रकरणात (Angadia Extortion Case) आरोपी असलेल्या IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांना न्यायालयाने दणका दिला आहे. सत्र न्यायालयाकडून (Mumbai Session Court) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. काही दिवसापुर्वी राज्य सरकारने (Maharashtra Government) देखील त्यांना सेवेतून निलंबित केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अंगडिया खंडणी प्रकरणात सौरभ त्रिपाठी यांचा शोध घेतला जात आहे तर अटकेपासून संरक्षण व्हावे, यासाठी त्रिपाठी यांनी सत्र न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. तर, त्रिपाठी यांच्यातर्फे वकील अनिकेत निकम (Adv Aniket Nikam) यांनी युक्तिवाद केला. निकम यांचा युक्तिवाद झाल्यानंतर पोलिसांनी आपली बाजू मांडली आहे. या दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी केलेली प्राथमिक चौकशी अहवालाची एक प्रत देण्यात यावी अशी मागणी निकम यांनी न्यायालयाकडे केली. परंतु, अद्याप तपास करणे बाकी असल्याने अहवाल देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. (IPS Saurabh Tripathi)

नेमकं प्रकरण काय?
अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी वसुली प्रकरणी मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यातील (Lokmanya Tilak Marg Police Station) ओम वंगाटे (Om Wangate), सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrested) केली आहे. तर, प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) कारवाईची भीती दाखवून अंगडिया व्यावसाय करणाऱ्यांकडून पोलिसांनी खंडणी वसुली केली हेाती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलिस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांची बदली केली होती. यानंतर त्रिपाठी सुट्टीवर गेले होते. दरम्यान, 6 दिवसांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आता पोलीस त्यांच्या शोधात आहेत. त्यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- IPS Saurabh Tripathi | angadia extortion case dcp ips saurabh tripathi pre arrest bail application rejected

हे देखील वाचा :

Pune Crime | सिंहगड रोड परिसरात तरुणाला बेदम मारहाण, 4 जणांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime | नर्‍हे येथील भुमकर चौकातील पानटपरी चालकाला पाईपाने मारहाण, तोडफोड करणाऱ्या तिघांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात FIR

Alia Bhatt Brand Valuation Report | सर्वात महागड्या कलाकारांमध्ये अभिनेत्री अलिया भट्ट पूढे, सुपरस्टार शाहरूख – सलमानसुद्धा पाडलं मागं…

Related Posts