IMPIMP

Jayant Patil | शिवसेनेतील बंडाळी भाजपप्रणित, जयंत पाटील यांचा दावा

by nagesh
Jayant Patil | suspension of ncp leader jayant patil till the end of winter session

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेत (Shivsena) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात मोठे बंड झाले. या बंडामध्ये शिवसेनेच्या तब्बल निम्म्याहून जास्त आमदार आणि 18 पैकी 12 खासदारांचा समावेश होता. या बंडाचे वाद आता सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Central Election Commission दरबारात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिवसेनेच्या बंडावर भाष्य केले आहे. महाराष्ट्रात हिंदुत्वाची मते फुटतील आणि आपल्याला पुन्हा कधीच सत्ता मिळणार नाही या भितीने ग्रासून भाजपने (BJP) शिवसेना फोडली, असा दावा आणि आरोप जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जयंत पाटील (Jayant Patil) हे सध्या कोल्हापूरात आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत भाजपवर निशाणा साधला.
शिवसेनेतील बंडाळी कधीच शिवसेनेची नव्हती. ती भाजपप्रणितच होती, असा दावा पाटलांनी केला आहे. काहीही झाले तरी महाराष्ट्रात आपल्याला टीकायचे असेल, तर दुसरा मोठा पक्ष संपविला पाहिजे हा उद्देश ठेऊन शिवसेना फोडण्यात आली असल्याचे जयंत पाटील म्हणाले. आता शिवसेनेचे पारंपारीक नाव आणि चिन्ह देखील गोठविण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घरातील शिवसेना चोरीला जाऊन ती आता कोणाच्या घरात गेली, हे येणाऱ्या काळात कळेलच, असे पाटील यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी बंडाची कबुली दिल्यामुळे ही गोष्ट नक्की होते की, शिवसेना फोडण्याचे आणि बाळासाहेबांच्या
(Balasaheb Thackeray) पक्षाचे दोन तुकडे करण्याचे कारस्थान भाजपचेच आहे.
वास्तविक बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील. त्यामुळे त्या नावावर त्यांचा प्रथम अधिकार आहे.
तरी देखील आयोग शिंदे यांच्या सेनेला बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena of Balasaheb) नाव देतो आहे.
हे सर्व पूर्वनियोजित असल्याप्रमाणे सुरु आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावरील राग पदोपदी वाढत चालला आहे,
असे यावेळी जयंत पाटील म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Jayant Patil | bjp commits sin of breaking shivsena fearing never to come back to power allegation ncp jayant patil

हे देखील वाचा :

Satara Crime | सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी 7 जणांची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Accident | शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात हॉटेल मॅनेजरसह तीन तरुण ठार

Pune Crime | वीजेचा धक्क्याने मजूर ठार, ठेकेदार व जागा मालकाविरूद्ध FIR; जांभुळवाडीतील घटना

Related Posts