IMPIMP

Jayant Patil On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या पत्रावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले – ‘राज्यातील घराघरापर्यंत पोहोचेल इतका मनसे पक्ष मोठा नाही’

by nagesh
Jayant Patil On Raj Thackeray | ncp jayant patil reaction over mns chief raj thackeray letter over mosque loudspeaker issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Jayant Patil On Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्क्षक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj
Thackeray) यांनी काल (गुरूवारी) एक पत्र सादर केलं आहे. त्यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करत ट्विटच्या माध्यमातून माहिती
दिली. तसेच मशिदींवरील भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा आहे, असा आदेशच त्यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना दिला आहे. यानंतर
मनसेवर टीका होताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज ठाकरेंना टोला
लगावला आहे. (Jayant Patil On Raj Thackeray)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

“राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष घराघरापर्यंत पोहोचेल इतका काही मोठा नाही.” असं म्हणत जयंत पाटील यांनी मनसे आणि राज ठाकरे यांना पत्रावरुन टोला लगावला आहे. तसेच, त्यावेळी बोलताना ते म्हणाले, “त्यांनी जे पत्रक काढले आहे, ते कुठपर्यंत पोहोचते, त्याला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, हे पाहून बोलेन,” अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.

राज ठाकरे पत्रातून काय म्हणाले?

“माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यां पर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.”

पुढे ते म्हणतात, “तुम्ही एकच करायचं आहे- माझं पत्र तुम्ही राहात्या परिसरातील घराघरात स्वत: नेऊन द्यायचं आहे.
कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही.
मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.”
असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे,

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Jayant Patil On Raj Thackeray | ncp jayant patil reaction over mns chief raj thackeray letter over mosque loudspeaker issue

हे देखील वाचा :

DL Renewal | Driving Licence एक्सपायर झाले असेल तर करू नका चिंता, ‘या’ स्टेप्स फॉलो करून घरबसल्या करा आपले DL रिन्यू

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक

Related Posts