IMPIMP

LIC Jeevan Labh Policy | ‘एलआयसी’ची जीवन लाभ पॉलिसी देईल मोठा फायदा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळतात ‘लाभ’

by nagesh
LIC Jeevan Labh Yojana | this scheme of lic will give you 20 lakhs on investment of rs 252 just have to wait for so many years

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC Jeevan Labh Policy | भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहे. एलआयसी जीवन लाभ पॉलिसी (LIC Jeevan Labh Policy) मॅच्युरिटीच्या वेळी पॉलिसी होल्डरला एकरक्कमी रक्कम प्रदान करते. मॅच्युरिटीच्या अगोदर पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या बाबतीत कुटुंबाला आर्थिक मदतसुद्धा देते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

एंडोनमेंट विमा पॉलिसी
एलआयसी टर्म्स इन्श्युरन्स पॉलिसी, मनी बॅक इन्श्युरन्स प्लान, पेन्शन प्लान आणि हेल्थ इन्श्युरन्स अशा प्रकारच्या पॉलिसी देते. एलआयसीची एंडोनमेंट इश्युरन्स स्कीम सेफ्टी अणि सेव्हिंग आणि बचतीचे एक संयोजन आहे. एलआयसीची जीवन लाभ पॉलिसी (LIC Jeevan Labh Policy) राज्याच्या मालकीच्या विमा कंपनी द्वारे प्रदान केल्या जाणार्‍या एंडोनमेंट विमा पॉलिसीपैकी एक आहे.

विमा रक्कमेची कमाल मर्यादा नाही
एलआयसी जीवन लाभ पॉलिसी 8-59 वर्ष वयोगटातील कुणीही व्यक्ती घेऊ शकते. जर पॉलिसी कालावधी 16 वर्षासाठी आहे. एलआयसीच्या जीवन लाभ पॉलिसीसाठी किमान विमा रक्कम 2 लाख रुपये आहे आणि एलआयसीच्या वेबसाइटनुसार विमा रक्कमेची कोणतीही कमाल मर्यादा नाही.

चार प्रकारे भरू शकता प्रीमियम

एलआयसी जीवन लाभ पॉलिसीच्या प्रीमियमचे पेमेंट नियमित प्रकारे मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक आधारावर केला जाऊ शकते. वार्षिक, अर्ध-वार्षिक आणि त्रैमासिक मोडमध्ये पेमेंटसाठी एक महिन्याचा सूट कालावधी आहे. परंतु 30 दिवसांपेक्षा कमी नाही आणि मासिक पेमेंटच्या बाबतीत 15 दिवसांची परवानगी आहे.

एलआयसी जीवन लाभ पॉलिसीसाठी तीन वेगवेगळ्या पॉलिसी/प्रीमियम-भरणा अटी प्रदान करते :
16 वर्षाचा पॉलिसी कालावधी आणि 10 वर्षाचा प्रीमियम भरणा कालावधी, 21 वर्षाचा पॉलिसी कालावधी आणि 15 वर्षांचा प्रीमियम भरणा कालावधी, आणि 25 वर्षाचा पॉलिसी कालावधी आणि 16 वर्षाच्या प्रीमियम भरणा कालावधी.

मॅच्युरिटीवर मिळतात हे लाभ
जर ग्राहकाने 21 वर्षाचा पॉलिसी कालावधी निवडला तर कमाल वयोमर्यादा 54 वर्ष आहे.
एलआयसीनुसार 25 वर्षाचा पॉलिसी कालावधी निवडण्यासाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्ष (75 वर्षांचे मॅच्युरिटी वय) आहे.
मॅच्युरिटीवर, पॉलिसी धारकाला एलआयसीनुसार, पॉलिसी कालावधीच्या अखेरीस साधारण रिव्हर्सनरी बोनस आणि एकरक्कमी अंतिम अतिरिक्त बोनससह मॅच्युरिटीवर विमा रक्कम मिळेल.

प्राप्तीकर लाभासाठी पात्र
एलआयसीची जीवन लाभ पॉलिसी प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 (सी) अंतर्गत प्राप्तीकर लाभासाठी पात्र आहे.

Web Title :- LIC Jeevan Labh Policy | lic jeewan labh policy premium eligibility criteria sum assured and other benefits

हे देखील वाचा :

Pune NCP Nokari Mohastav | पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘नोकरी महोत्सवा’त 700 बेरोजगारांना नोकरी

Modi Government | मोदी सरकारची ‘ही’ योजना विवाहित लोकांसाठी खुपच फायदेशीर, दरमहा मिळेल 10 हजारांची पेन्शन, जाणून घ्या

Home Loan | घसरणार्‍या व्याजदरांचा तुम्ही ‘या’ पध्दतीनं घेऊ शकता फायदा, जाणून घ्या महत्वाचे मुद्दे

Related Posts