IMPIMP

Maharashtra Cabinet Expansion | ‘काही नावं टाळली असती तर…’; शपथविधी पाहून अजित पवारांचा टोमणा

by nagesh
 Ajit Pawar | ajit pawar left the mantralaya as the fifa logo unveiling program over did not start after waiting for three hours

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Cabinet Expansion | राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार आज सकाळी पार पडला. राजभवनाच्या (Raj Bhavan) दरबार हॉलमध्ये (Durbar Hall) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. सध्याच्या मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) कोणत्याही महिला आमदाराला संधी दिलेली नाही. आज भाजपच्या (BJP) 9 आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे देखील उपस्थित होते. शपथ विधी सोहळ्यानंतर जाताना अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन राज्य सरकारला टोमणा मारला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अजित पवार म्हणाले, काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं… तसेच उशिरा का होईना महाराष्ट्राला मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Expansion) मिळालं. आता राज्याचे प्रश्न सोडवावे. ज्यांच्याबद्दल काही बोललं जात, क्लिनचीट मिळाली नाही त्यांनाही मंत्रिमंडळात घेतलं जातं ते टाळलं असतं तर बर झालं असतं. असं अजित पवारांनी म्हटलं. एका वृत्तवाहिनीला त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कोणाचंही नाव घेणं टाळलं आहे.

संजय राठोड मंत्रिमंडळात
आजच्या मंत्रिमंडळात यवतमाळ मधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासोबत मंत्रीमंडळात दिसणार आहेत. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलन केलं होतं तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक ट्विट केलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुजा चव्हाणच्या (Pooja Chavan) मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे.
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे.
माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

Web Title :-  Maharashtra Cabinet Expansion | ncp ajit pawar reaction over eknath shinde and devendra-fadnavis cabinet expansion

हे देखील वाचा :

Stock Market Holiday List | शेअर बाजारामध्ये 3 दिवस व्यवहारांना ‘ब्रेक’, जाणून घ्या का होणार नाही ट्रेडिंग

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! प्रेम प्रकरणातून तरुणाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या, 8 महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

RBI Action On Co-Op Banks | RBI ची कडक कारवाई ! आता महाराष्ट्रातील 3 बँकांसह ‘या’ 8 को-ऑपरेटिव्ह बँकांना दणका, ठोठावला लाखो रूपयांचा दंड

Related Posts