IMPIMP

Maharashtra Rains Update | राज्यात काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’

by nagesh
Maharashtra Rains Update | heavy rainfall in vidarbha konkan weather update imd

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rains Update | राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने (Maharashtra Rains Update) धुमाकूळ घातला आहे. सततच्या रिपरिपीमुळे सर्वत्र जलमय वातावरण झालं आहे. दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) देण्यात आला आहे. रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला असून पुणे (Pune) आणि सातारा (Satara) जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाने कहर केला आहे. जोरदार पावसाने अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत केले आहे. या दरम्यान, औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Rains Update)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्याचबरोबर अकोला, अमरावतीत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. विदर्भातील (Vidarbha) सात जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. या पावसामुळे वणा नदी आणि भाकरा नाल्याला पूर आला आहे. 700 हून अधिक घरात या पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे या भागात बचाव कार्य सुरु केलं आहे.

Web Title :- Maharashtra Rains Update | heavy rainfall in vidarbha konkan weather update imd

हे देखील वाचा :

Jalna Crime | पुण्यातून KTM मोटारसायकल चोरणारी दुकली जालना पोलिसांकडून गजाआड, 5 दुचाकी जप्त

Shivsena | उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

Pune Crime | राजस्थानमधून पुण्यात अफू विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक, 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त

Related Posts