IMPIMP

Maharashtra Rains Update | राज्यात पावसाचा जोर कमी; पूरस्थिती भागातील नागरिकांना दिलासा, शेतीच्या कामांना गती

by nagesh
Rain In Maharashtra | weather updates in maharashtra mumbai pune konkan vidarbha imd alert heavy rain

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rains Update | राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Maharashtra Rains Update) धुमाकूळ घातला आहे. या सततच्या पावसामुळे अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकीकडे पावसामुळे शेतकरी आनंदीत आहेत तर दुसरीकडे काही भागात शेती पिकांचे (Agricultural Crops) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आता पाऊस ओसरला असल्याचं दिसत आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील नागरीकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दोन आठवड्यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणपट्टा. अशा विविध भागांना पावसाने (Rains) झोडपून काढले आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. अशातच पावसाने उघडीप घेतल्याने ज्या ठिकाणी पूरस्थिती होती, त्या ठिकाणच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पावासाचा जोर कमी झाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. (Maharashtra Rains Update)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून वरुणराजाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने शेतीच्या कामांनाही वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 16 बंधाऱ्यांवर पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झालीय. जिल्ह्यातील अद्याप 15 बंधारे पाण्याखाली असले, तरी पाणी वेगाने ओसरत असल्याने ते देखील लवकरच मोकळे होतील, असं चित्र आहे.

दरम्यान, नाशिक, बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.
या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, कालपासून काही प्रमाणात पावसाचा जोर कमी आला आहे.

Web Title :- Maharashtra Rains Update | maharashtra rain 22 july 2022

हे देखील वाचा :

RBI करणार आहे मोठी घोषणा ! येथे जमा केलेल्या पैशावर मिळेल मोठा फायदा, जाणून घ्या कसा

Presidential Election | द्रौपदी मुर्मू यांचा विजय, राष्ट्रपतीपदावर पहिल्या आदिवासी महिला विराजमान

Share Market | लागोपाठ 5 व्या दिवशी तेजीत बंद झाला बाजार, सेन्सेक्स 284 अंकानी वाढला

Related Posts