IMPIMP

MP Sanjay Raut | काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी, खाकी पॅन्ट घालून सभागृहात येतील, रेशीबाग भेटीवरून संजय राऊतांचा घणाघात

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut criticised of chief minister eknath shinde visit to reshim bagh in nagpur

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नागपूरमधील रेशीमबाग (Reshim Bagh) येथील डॉ. हेडगेवार स्मृतीभवन येथे जाऊन आदरांजली वाहिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Dr. Keshav Baliram Hedgewar) यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केले. यावरुन ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी, खाकी पॅन्ट घालून सभागृहात येतील असे संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रेशमी कीडा त्यांच्या कानात वळवळत आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रेशीमबाग भेटीवरुन संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, संघ विचारांचा रेशमी कीडा हा त्यांच्या कानात वळववळत आहे. काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी, खाकी पॅन्ट घालून येतील एवढ्या लवकर बदल होईल असं वाटलं नव्हतं, अशा शब्दांत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

ही हुकूमशाही आहे

मुंबई महापालिकेतल्या (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यालयावर शिंदे गटाने दावा केला. मात्र हा दावा करताना पालिकेच्या कार्यालयात घुसून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ताबा घेतला. या राड्यानंतर पालिका आयुक्तांनी शिवसेनेच्या (Shivsena) कार्यालयाला टाळे ठोकले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, काल पालिकेत सगळे नाही, काही मोजकेच गेले होते. परंतु जे गेले ते घुसखोरच आहेत. ते सगळीकडे घुसखोरी करत असतात. पालिका कार्यालय सील केली आहेत कशी केली गेली ही हुकूमशाही आहे. एकदा तुमच्या मुख्यमंत्री कार्यालयात भाजपवाले (BJP) कसे घुसतील हे लवकरच कळेल असे राऊत म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एका बापाचे असतील तर येतील

शिवसेना भवन हे बाळासाहेबांचं आहे, इथे कोणाचा बाप येऊ शकत नाही. शिवसेना भवन सर्वांचं आहे.
नरेश म्हस्के (Naresh Mhaske) हे एकनाथ शिंदे यांच्या तक्रारी घेऊन यायचे.
आता त्यांना काही बोलायचा अधिकार नाही, असा घणाघात संजय राऊतांनी केला.

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut criticised of chief minister eknath shinde visit to reshim bagh in nagpur

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘बावनकुळेंच्या त्या वक्तव्यानंतर आमची तर झोपच हरपली’, अजित पवार यांचा मिश्कील टोला

Tunisha Sharma Suicide Case | तुनिषा आत्महत्या प्रकणात पोलीस तपासात झाला खुलासा; ‘आत्महत्यापूर्वी तुनिषा आणि शिझान यांच्यात झाले होते संभाषण’

Pune Crime News | पतीच्या बाहेरख्यालीला विरोध केल्याने विवाहितेचा छळ; महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिघांना अटक

Related Posts