IMPIMP

Narayan Rane | ‘शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची सवय’ – नारायण राणे (व्हिडिओ)

by nagesh
MP Sanjay Raut | shivsena leader sanjay rauts response to bjp leader narayan rane criticism

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे वेगळेच फटाके सध्या राज्याच्या राजकारणात फुटताना पहायला मिळत आहे. आणि त्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुद्यांवर भूमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला. मागील काही दिवसांपासून घडलेल्या घडामोडींवरुन त्यांनी या दोघांना लक्ष्य करताना राष्ट्रवादीचे नेते (NCP) नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर देखील टीका केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

बारामतीच्या फटाक्यात आवाजही नाही आणि धुरही नाही

पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे (Narayan Rane) यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीत झालेल्या इन्क्युबेशन सेंटर उद्घाटन
कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की फटाके वाजवा पण धूर सोडू नका आणि आवाजही करु नका.
असे फटके फक्त आघाडी सरकारच्याच दुकानात मिळतात.
असाच एक धूर बारामतीत सोडण्यात आला. त्याला आवजही नव्हता, धूरही नव्हता, फक्त वास होता, असे राणे म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

संजय राऊतांना टोला

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी संजय राऊतांना टोला लगावला. गेले दोन दिवस संजय राऊतांचा अग्रलेख मी वचला.
देशात विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यात एक जागा दादरा नगर हवेलीची (Dadra Nagar Haveli)
अपक्ष उमेदवाराने जिंकली. शिवसेनेने डंका सुरु केला की राज्याच्या बाहेर आम्ही जिंकलो. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागून घेतली.
ती फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याचे आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच.
कमला डेलकर (Kamala Delkar) निवडून आल्या. त्याबद्दल शिवसेना आम्हाला मिळालं.
आता दिल्ली काबीज करणार म्हणतायत. लिखान करताना त्या व्यक्तीला भान नसेल.
रात्री जे करायचं ते दिवसा केल्यामुळे संजय राऊतांबाबत असा परिणाम होतोय का हे मला माहित नाही, असं राणे म्हणाले.

मुख्यमंत्री पद मिळाले निष्ठा विकली

उद्धव ठाकरेंनी हे सरकार बनण्याआधी पवारांबद्दल जे उद्गार काढले हे सांगतो. पवारांना विनंती आहे की धरणाच्या आत अजित पवारांना (Ajit Pawar) नेऊ नका.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक म्हणजे अर्धवट मेंदूचे लोक आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे रिकामे डबके. सोनिया गांधींनी (Sonia Gandhi)
काढून टाकल्यानंतर तुम्ही पुन्हा लाचारीने त्यांच्याकडे गेलात. शरद पवारांसारखा लाचारपणा आमच्या रक्तात नाही.
अजित पवारांचे रडणे म्हणजे मगरीचे अश्रू. नशीब महाभारतात शरद पवार नव्हेत नाहीतर तिथेही फोडाफोडी केली असती.
अशी विधानं उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी केली होती.
आता मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून निष्ठा विकली, असा घणाघात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Narayan Rane | narayan rane targets shivsena sanjay raut uddhav thackeray on dadra nagar haveli result

हे देखील वाचा :

Earn Money | नोकरीसह 1 लाख रुपयात सुरू करा हा बिझनेस, महिन्याला होईल 40000 पेक्षा जास्त कमाई, सरकार करेल 80% मदत

7th Pay Commission | ‘या’ सेक्टरच्या कर्मचार्‍यांना सुद्धा येणार वाढीव पगार, नोव्हेंबरपासून महागाई भत्त्यात झालीय वाढ

Ajit Pawar | अजित पवारांना ‘कोरोना’ सदृश्य लक्षणं, ड्रायव्हरसह 4 कर्मचाऱ्यांना Coronaची लागण

Related Posts