IMPIMP

Nashik Crime | नाशिक-सिन्नर मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वारांना चिरडत एसटीने घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू

by nagesh
Nashik Crime | nashik sinnar highway st bus accident four to five people died nashik bus accident crime news marathi

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन  – नाशिक-सिन्नर महामार्गावर (Nashik Sinnar Highway) तीन वाहनांचा भीषण अपघात (Nashik Crime) झाला आहे. एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला. या दुर्घटनेत चार ते पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Nashik Crime) घटनास्थळी धाव घेत, बचावकार्य सुरू केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिंदे – पळसे टोल नाक्याजवळ हा अपघात झाला.
भरधाव वेगात येणाऱ्या एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि त्याने धावती बस चार ते पाच
दुचाकीस्वारांच्या अंगावर घातली. त्यात हे दुचाकीस्वार चिरडले गेले आहेत.
या भरधाव बसने समोरून येत असलेल्या एका एसटी बसलादेखील जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये चार ते पाच दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तसेच बसनेदेखील पेट घेतला आहे.
बसमधील काही प्रवासीदेखील गंभीर जखमी झाले आहेत.
यावेळी बसमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी बसच्या आपत्कालीन खिडकीतून बाहेर उड्या घेतल्या.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी बचावकार्य सुरू केले आहे. स्थानिक नागरिकदेखील मदत करत आहेत.
बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले.
बसमधील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात असून,
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Nashik Crime | nashik sinnar highway st bus accident four to five people died nashik bus accident crime news marathi

हे देखील वाचा :

PSI And Police Personnel Suspended | विनयभंगाच्या गुन्ह्यात मदतीसाठी लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Radhakrishna Vikhe Patil On Congress Leadership | ‘काँग्रेस नेतृत्वाने आता संन्यास घेऊन हिमालयात जावे’ – राधाकृष्ण विखे पाटील

Nana Patole On Gujarat Election Results | ‘भय, भ्रष्टाचार, भूक अशा गोष्टींचा वापर गुजरात निवडणुकीत झाला’; गुजरात निवडणूक निकालावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Related Posts