IMPIMP

Organ Donation | 14 वर्षाच्या ब्रेन डेड मुलानं पुण्यातील व्यक्तीसह 6 गरजूंना दिलं ‘जीवदान’ ! हृदय, फुफ्फुस, डोळे, लीव्हर आणि दोन्ही हात आई-वडिलांनी केले ‘दान’

by nagesh
Organ Donation | 14 year old brain dead child gave life to 6 people family donated heart lung liver eyes hands

अहमदाबाद : वृत्तसंस्था Organ Donation | गुजरातच्या सूरत (Surat) शहरात अवघ्या 14 वर्षाच्या मुलाच्या अवयवदानाने (Organ Donation) 6 इतर लोकांना नवीन जीवदान मिळाले आहे. 10 वीत शिकणार्‍या या मुलाचे नाव धार्मिक काकडिया (Dharmik Kakadia) आहे. धार्मिक काकडिया आता केवळ फोटोपुरता मर्यादित राहिला असला तरी अवयव रूपाने आजही त्याचे जगात अस्तित्व आहे.

धार्मिक काकडियाची मागील 27 ऑक्टोबरला अचानक तब्येत बिघडली तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी उपचारासाठी सूरतच्या किरण हॉस्पिटल (Kiran Hospital, Surat) मध्ये त्याला दाखल केले. येथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला ब्रेन डेड (brain dead) घोषित केले होते. धार्मिक काकडिया ब्रेनडेड झाल्याची माहिती जेव्हा सूरतच्या डोनेट लाईफ संस्थेला (Donate Life organization, Surat) मिळाली तेव्हा त्यांच्या टीमचे लोक किरण हॉस्पिटलमध्ये पोहचले. त्यांनी धार्मिकच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी (Organ Donation) समजावले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

हृदय, फुफ्फुस, डोळे, लीव्हर आणि दोन्ही हात केले ट्रान्सप्लांट (Organ Donation)
अवयवदानाचे महत्व समजल्यानंतर धार्मिकचे आई-वडील मुलाच्या अवयवदानासाठी तयार झाले आणि मुलाचे अवयवदान केले. ब्रेन डेड धार्मिक काकडियाच्या हृदय, फुफ्फुस, डोळे, लीव्हर आणि दोन्ही हातांमुळे 6 गरजूंना जीवदान मिळाले. सूरत शहरातून मिळालेले हृदय, फुफ्फुस, डोळे, लीव्हर आणि दोन्ही हात चेन्नई, अहमदाबाद आणि मुंबईत पोहचवण्यासाठी तीन वेगवेगळे ग्रीन कॉरिडोअर बनवले होते.

सूरत-मुंबई 292 किलोमीटरचा प्रवास 105 मिनिटात
सूरतच्या किरण हॉस्पिटलमधून मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलपर्यंतचा 292 किलोमीटरचा प्रवास 105 मिनिटात पूर्ण करून पुण्यातील रहिवासी असलेल्या 32 वर्षीय व्यक्तीच्या शरीरात दोन्ही हात ट्रान्सप्लांट करण्यात आले.

तसेच हृदयाचे ट्रान्सप्लांट जूनागढचा 15 वर्षांचा 11 वीचा विद्यार्थ्याच्या शरीरात अहमदाबादच्या सीम्स हॉस्पिटलमध्ये करण्यात आले.
तर फुफ्फुसाचे ट्रान्सप्लांट आंध्र प्रदेशात राहणार्‍या 44 वर्षीय व्यक्तीच्या शरीरात चेन्नईच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये करण्यात आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अशाप्रकारे लीव्हरचे ट्रान्सप्लांट गुजरातच्या पाटण येथे राहणार्‍या 35 वर्षीय व्यक्तीच्या शरीरात अहमदाबादच्या जायडस हॉस्पिटलमध्ये करण्यात आले.
ब्रेनडेड 14 वर्षीय धार्मिक काकडियाच्या डोळ्यांचे ट्रान्सप्लांट सूरतच्या किरण हॉस्पिटलमध्ये गरजू व्यक्तीच्या शरीरात करण्यात आले.

धार्मिकच्या कुटुंबाला माहित होत्या ऑर्गन फेलियरच्या वेदना
सूरतचे अजय भाई काकडिया सूरतच्या एक डायमंड कंपनीत मॅनेजर आहेत.
अजय भाई काकडिया आणि त्यांची पत्नी ललिता बेन यांना मृत धार्मिकसह एक मुलगीही आहे.
14 वर्षांचा धार्मिक काकडिया मागील पाच वर्षापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होता.

किडनीदान न मिळाल्याने झाला मृत्यू
धार्मिकला मागील एक वर्षापासून आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागत होते.
धार्मिक काकडियाची किडनी खराब असल्याने त्याला किडनी दान मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू होती.
याच दरम्यान 27 ऑक्टोबरला धार्मिकचे ब्लड प्रेशर वाढले होते.
यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि त्यास सूरतच्या किरण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
येथे त्यास ब्रेनडेड घोषित करण्यात आले होते.

Web Title :- Organ Donation | 14 year old brain dead child gave life to 6 people family donated heart lung liver eyes hands

हे देखील वाचा :

Nawab Malik | नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट ! म्हणाले – ‘समीर वानखेडे PM मोदींहून पुढे गेले; 1 लाखाची पँट, 70 हजारांचा शर्ट, अन्…’

Anil Deshmukh | विदर्भातील उमद्या नेत्याची कारकीर्द अटकेने ‘काळवंडली’

Deglur Assembly bypolls result | भाजपाला धक्का ! देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

Related Posts