IMPIMP

PMC Solid Waste Management Dept | पोलीसनामा इम्पॅक्ट ! स्वच्छ सेवकांना तातडीने रेनकोट उपलब्ध करून दिले जातील – पुणे महापालिका

PMC
July 24, 2024

पुणे – PMC Solid Waste Management Dept | घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या स्वच्छता दूताना तातडीने रेनकोट उपलब्ध करून देण्यात येतील. रेनकोट व अन्य साहित्याची निविदा मंजुरीच्या तांत्रिक मान्यतेला असून ती मान्य होईल या भरवशावर संबंधित पुरवठादाराला रेनकोटचा तातडीने पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम (Sandeep Kadam PMC) यांनी दिली.

शहरात घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करण्याचे काम स्वच्छ संस्थेमार्फत करण्यात येते. या संस्थेचे सुमारे चार हजार कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना चप्पल, रेनकोट, एप्रन, ढकलगाड्या, बकेट पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. संस्थेमार्फत जानेवारीपासून या वस्तूंसाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र पावसाळा सुरू झाला तरी त्यांना अद्याप रेनकोट व अन्य साहित्य मिळालेले नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही अद्याप किमान रेनकोट न मिळाल्याने स्वच्छ सेवकांना रेनकोट मिळालेले नाहीत.

दुसरीकडे या कालावधीत घनकचरा विभागाकडून मात्र कचरा प्रक्रिया प्रकल्प, यांत्रिक पद्धतीने सफाईच्या कामाच्या कोट्यवधींच्या निविदा काढण्यात येत आहेत. ही कामे मर्जीतील ठेकेदारांना मिळावीत यासाठी राजकीय पाठिंब्याच्या खोगिरीवर घनकचरा विभाग स्वार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. यासंदर्भातील वृत्त मंगळवारी पोलिसनामा ने प्रसिद्ध केले.

दरम्यान यासंदर्भात घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले दर दोन वर्षांनी स्वच्छ सेवकांना रेनकोट देण्यात येतात. तर अन्य साहित्य दरवर्षी दिले जाते. मागीलवर्षी सीएसआर मधून काही रेनकोट देण्यात आले होते. यंदा देखील निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. निविदा देखील आल्या आहेत. तांत्रिक बाबी पूर्ण होयच्या आहेत. पुरवठादार निश्चित झाला असून त्याला तातडीने रेनकोट पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. एक दोन दिवसांत रेनकोट दिले जातील.