IMPIMP

Pune Connection Of Sidhu Moose Wala Murder Case | सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात पुणे कनेक्शन; संतोष जाधव आणि सौरभ महांकाळ यांच्याविरूध्द लुकआउट नोटीस

by nagesh
Pune connection in Sidhu Moose Wala murder case Lookout notice against Santosh Jadhav and Saurabh Mahankaal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Connection Of Sidhu Moose Wala Murder Case | पंजाबमधील सुप्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली. या हल्ल्याबाबत नवनवीन खुलासे होण्यास सुरुवात झाली आहे. ही हत्या कोणी केली याचा शोध सुरु असताना आता एक मोठी माहीती समोर येत आहे. गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात आता पुणे कनेक्शन (Pune Connection) समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याच्या (Pune Connection Of Sidhu Moose Wala Murder Case) संशयावरून दोन जणांविरुद्ध लुकआउट नोटीस (Lookout Notice) जारी करण्यात आली आहे. संतोष जाधव (Santosh Jadhav) आणि सौरभ महांकाळ (Saurabh Mahankaal) हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. दरम्यान, मंचरचा सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ रानिया बाणखेले (Omkar Alias Rania Bankhele) याच्या खून प्रकरणात संतोष जाधव फरार असून पुणे पोलिसांची गुन्हे शाखा (Pune Police Crime Branch) संतोष जाधवच्या शोधात आहेत. हे दोघेही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील (Lawrence Bishnoi Gangster) असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, सिद्धू मूसेवाला यांची 29 मे रोजी हत्या करण्यात आली होती.
भर दिवसा जीपमधून जात असताना मुसामध्ये बंदुकीने गोळ्या घालून मूसेवालाचा खून करण्यात आला होता.
हल्ल्यानंतर मूसेवाला त्यांच्या जीपमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली.
आता या प्रकरणाचं पुणे कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा तपास पोलिस करत आहे.

 

Web Title :- Pune connection in Sidhu Moose Wala murder case Lookout notice against Santosh Jadhav and Saurabh Mahankaal

हे देखील वाचा :

PM Narendra Modi | अरब देशातील कचराकुंडीवर चक्क PM मोदींचा फोटो

Varsha Gaikwad | ‘शाळा नियोजित वेळेनुसारच सुरू होणार’ – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Pune Crime | टोळक्याकडून बांधकाम व्यावसायिकास बेदम मारहाण, कारवर केली दगडफेक; चंदननगर-खराडी परिसरातील घटना

Related Posts