IMPIMP

Pune Corporation | शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासन लागले कामाला

by bali123
Pune PMC Election 2022 | After reservation changes in as many as 25 wards 'Kahi Khushi Kahi Gum...'

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) –  Pune Corporation | पुणे शहरातील अनेक भागामध्ये खड्यांची दैना झाली आहे. शहरातील अनेक ठिकाणावरील रस्ते (Roads) खचले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे पालिका प्रशासनाने (Pune Corporation Administration) शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची तयारीला प्रारंभ केला आहे. येथील कर्वेनगर (Karvenagar) मधील खचलेला रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. तर, मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी नाहीशी करण्यासहीत रस्ते व्यवस्थित करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि वाहतूक पोलिस (Traffic police) शनिवारी पाहणी करणार असल्याचं म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

शहरातील अनेक भागातील रस्त्यावरील खड्डे पडले आहेत. पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिनी टाकताना खोदकाम केले होते. हे रस्ते दुरुस्तीनंतर लगेच खचले आहेत. म्हणून वाहनांना अडथळा होतो. यामुळे अनेक वाहने चालवताना नागरिकांची तारांबळ उडत आहे. हे पाहता रस्ते दुरुस्त व्हावे यासाठी लोकांकडून मागणी होत आहे. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने येथील रस्ते तात्काळ दुरुस्त झाले नाहीत. मात्र आता, पालिका प्रशासन (Pune Municipal Administration) जोमाने कामाला लागले आहे. यावरून कर्वेनगर येथे अलंकार पोलिस ठाणे (Alankar Police Thane) ते चितळे बंधू चौकदरम्यान रस्त्याचे काम त्वरित सुरूकेले आहे. या अगोदर येथील रस्त्यावर माती टाकून सिमेंट टाकले होते. म्हणून रस्ते खचले होते. आता मात्र, ठेकेदाराकडून रस्त्यावर मुरूम टाकून रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

‘शहरातील खड्ड्यांसंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी त्वरित खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार महापालिकेच्या हॉटमिक्स प्लांटमधून डांबर घेऊन खड्डे बुजविण्याचे केले जाणार आहे.
आता पाऊस नसल्याने दिवसा आणि रात्री देखील हे काम केले जाणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार (Additional Commissioner Dr. Kunal Khemnar) यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्त्यावरील रस्त्याची परिस्थिती, वाहतूक कोंडीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी शनिवारी (7 ऑगस्ट) रोजी पथ विभागाचे अधिकारी आणि वाहतूक पोलिस हे संयुक्तपणे पाहणी करणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली आहे.

Web Title : pune corporation administration taking fill pits

PMRDA | पीएमआरडीएचा विकास आराखडा जाहीर ! धरणे, कालवे परिसरात 20 टक्के बांधकामास परवानगी

MP Sanjay Raut | ‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आला, आम्ही काही बोललो का? राऊतांचा पलटवार

SSY | ‘या’ बँकेची विशेष ऑफर ! 250 रुपयात उघडा हे खाते, थेट 15 लाखाचा होईल फायदा, जाणून घ्या कसे?

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर ! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO ने दिली ही महत्वाची माहिती 

Related Posts