IMPIMP

Pune Crime | 6.75 कोटीचं प्रकरण ! मंगलदास बांदल याच्यासह संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे यांच्यावर खंडणीचा FIR; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले ‘गहाण’ खत

by nagesh
Pune Crime | Pune criminals Ganesh Chaudhary and Ajay Vishwakarma are deported from Pune district for two years

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Pune Crime |पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल (mangaldas bandal) याच्याविरुद्ध आणखी एक खंडणीचा (ransom) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांदल याने एका शेतकर्‍याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन घेतले व परस्पर 6 कोटी 75 लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) मंगलदास बांदलसह (mangaldas bandal) पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी गंगाराम सावळा मासाळकर (वय 74, रा. वढु खुर्द, ता़ हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार वढु खुर्द येथे 2013 मध्ये व त्यानंतर वेळोवेळी घडला आहे.

फिर्यादी यांची गट क्र. 153/1 मध्ये 3 हेक्टर 71 आर जमीन आहे. बांदल व इतरांनी फिर्यादी यांना चारचाकी गाडीमध्ये डांबून ठेवून दमदाटी करुन व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन घेतले. त्यांच्या परस्पर 6 कोटी 75 लाख रुपये काढून घेतले. या जमिनीवरील बोझा कमी करण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयांची मागणी केली. परंतु, त्यांनी अद्यापर्यंत फिर्यादीचे जमिनीवरील बोझा कमी केला नाही. त्यांचे राजकीय लांगेबांधे असल्याचे फिर्यादी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिल्यास ते फिर्यादीचे कुटुंबियांना त्रास दतील म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली नव्हती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्यात (shikrapur police station) मंगलदास बांदल याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत.
शिक्रापूर येथील दत्तात्रय मांढरे यांच्या तक्रारीवरुन बांदल यांना शिक्रापूर पोलिसांनी 26 मे रोजी अटक केली होती.
त्यानंतर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणाचा तपास सुरु असताना रवींद्र सातपुते यांची फिर्याद दाखल झाली होती.

Web Title : Pune Crime | 6.75 crore case! ransom case FIR against Sandeep Bhondwe, Vikas Bhondwe, Sachin Palande along with Mangaldas Bandal

हे देखील वाचा :

SSC Exam Results | पुण्यातील शाळांमध्ये 10 वीच्या गुणपत्रिका 9 ऑगस्टपासून मिळणार

Sugarcane Juice | ऊसाचा रस लीव्हरसाठी खुपच ‘हेल्दी’, वायरल इन्फेक्शनपासून होईल बचाव, इम्यूनिटी वाढते

Coronavirus | राज्यातील ST महामंडळाच्या बसेसला करणार अँटी मायक्रोबियल कोटिंग, व्हायरस पसरण्यापासून रोखणार

Related Posts