IMPIMP

Pune Crime | हडपसर आणि येरवडा परिसरात अवैध धंद्यांना ऊत? गुन्हे शाखेकडून मटक्याच्या अड्डयांवर छापे, 20 जण ताब्यात

by nagesh
Pune Crime News | Crime Branch raids a .den in Shivane, Uttamnagar area, action taken against 16 people

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुणे शहरातील येरवडा (Yerwada Police Station) आणि हडपसर (Hadapsar Police Station) परिसरात अवैधरित्या सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर (Matka Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell, Pune) छापा टकला. या कारवाई 20 जणांवर कारवाई करण्यात आली असून 1 लाख 14 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मंगळवारी (दि.28)  येरवडा येथील भाटनगर परिसरातील श्रीकृष्ण मंदिराजवळ  मुंबई मटका जुगार (Mumbai Matka Gambling) खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून छापा टाकला असता काही जण मुंबई मटका जुगार पैशावर खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी जुगार घेणारे आणि जुगार खेळवणारे अशा 10 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 18 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्यांवर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

सामाजिक सुरक्षा विभागाने दुसरी कारवाई बुधवारी (दि.28) हडपसर येथे केली. फुरसुंगी (Fursungi) येथील साईस्वरा कॉम्पलेक्सच्या बाजूला असलेल्या दुकानामध्ये कल्याण मटका जुगार (Kalyan Matka Gambling) खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कल्याण मटका व पणती पाकोळी सोरट जुगार पैशावर खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य असा एकूण 95 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या जुगाराऱ्यांवर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar).
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके
(PSI Shridhar Khadke), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, अण्णा माने, संदीप कोळगे,
हनमंत कांबळे, अमित जमदाडे, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | Illegal businesses like mataka gamble in Hadapsar and Yerwada area? Pune Police Crime Branch raids Matka’s hideouts, 20 people detained

हे देखील वाचा :

Chandrasekhar Bawankule | मविआतील पक्षांना बावनकुळेंचा इशारा, म्हणाले – भविष्यात धक्क्यावर धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील…

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची दौंड तालुक्यात मोठी कारवाई, भेसळयुक्त गूळाचा साठा जप्त

Chandrasekhar Bawankule | ‘अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल’, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Related Posts