IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडक पोलिस स्टेशन – बनावट सोने विकणार्‍या महिलेला अटक

by nagesh
 Pune Crime News | Khadak Police Station - Woman selling fake gold arrested

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | हॉलमार्क असलेला सोने (Hallmark Gold) घेऊन एक महिला आली. जुने सोने देऊन तिने
दुसरा दागिना पसंत केला. हॉलमार्क असल्याने त्यावर विश्वास ठेवून सराफाने (Jewellers In Pune) तिला नवीन दागिना दिला. तो दागिना वितळविला,
तेव्हा तो दागिना बनावट असल्याचे लक्षात आले. या महिलेने अशा प्रकारे तीन ते चार वेळेस फसवणूक (Cheating Case) केली होती. पुन्हा पुन्हा ही
फसवेगिरी (Fraud Case) चालणार नाही, हे तिच्या लक्षात आले नाही. पोलिसांनी (Pune Police) तिला अटक केली. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

साक्षी अविनाश सोनी Sakshi Avinash Soni (वय ३२, रा. प्रेमजी जीवन सेनोटेरियम, पुणे स्टेशन – Pune Station) असे या महिलेचे नाव आहे.

याबाबत गणेश पेठेतील (Ganesh Peth Pune) एका सराफाने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४५/२३) दिली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कस्तुरे चौकात (Kasture Chowk) सराफ दुकान आहे. त्यांच्या दुकानात एका महिलेने जुने
दागिने देऊन नवीन दागिने घेतले होते. तिने दिलेले सोने बनावट (Gold Texture) निघाले होते. ३ ते ४ वेळा तिने हा प्रकार केला होता. सराफांनी याची
माहिती सर्व सराफांना पाठविली होती. ही महिला शनिवारी त्याच दुकानात पुन्हा आली. तिने सोन्याची बनावट सोनसाखळी आणली होती. त्यावर
हॉलमार्कचे चिन्ह होते. ही चैन देऊन तिला सोन्याचे मंगळसुत्र (Mangalsutra) खरेदी करायचे होते. फिर्यादी यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी
पोलिसांना सावध केले. पोलिसांनी तातडीने या सराफाचे दुकान (Jewellery Shops In Pune) गाठून महिलेला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक जोग
(PSI Jog) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime News | Khadak Police Station – Woman selling fake gold arrested

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : हिंजवडी पोलिस स्टेशन – निवृत्त विंग कमांडरची वाहन चालकाकडून 40 लाखांची फसवणूक

Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – पुण्यातील तथाकथित पत्रकाराला अटक; महिलेचा विनयभंग करुन दिली धमकी

Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

 

Related Posts