IMPIMP

Pune News | पुण्यातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे धनराज राठी यांचे निधन

by nagesh
Pune News | Dhanraj Rathi, known as a philanthropist in Pune, passed away

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यातील (Pune News) दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे आणि माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती धनराजजी मालचंदजी राठी Dhanrajji Malchandji Rathi (वय-70) यांचे आज (मंगळवार) पुण्यात (Pune News) निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे समाजाची मोठी हानी झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. राठी यांची अंतयात्रा आज (दि. 12 ऑक्टोबर) रात्री सात वाजता त्यांच्या सुखसागरनगर येथील निवासस्थानापासून निघणार आहे. त्यांच्यावर वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

धनराजजी मालचंदजी राठी हे समाजातील मोठे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राजस्थान सरकारने (Rajasthan Government) भामाशा पुरस्कार
(Bhamasha Award) देऊन सन्मानित केले होते.
राठी यांनी पुणे (Pune News) आणि राजस्थानसह देशातील अनेक संस्था भवन, धर्मशाळा, मंदिरे यांना मोठी आर्थिक मदत केली असून ते करत होते.
त्यांच्याकडे देणगीसाठी आलेला व्यक्ती कधीच रिकाम्या हाताने परतला नाही.

जोधपूरच्या (Jodhpur) राजांच्या ट्रस्टमध्ये ते विश्वस्त म्हणून कार्यरत होते. तसेच ते नागणेचा माता ट्रस्टचे देखील विश्वस्त होते.
राजस्थान मधील कोणताही व्यक्ती किंवा संस्था त्यांच्याकडे देणगीसाठी आली तर त्यांना रिकाम्या हाताने जाऊन दिले नाही.
त्यांनी 1999-2000 मध्ये महेश नागरी मल्टी स्टेट को-ऑप संस्थेची स्थापना केली. राठी हे संस्थापक अध्यक्ष होते.
पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला.
तसेच अनेक बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास आणि समजात ताट मानेने जगण्यास मदत केली.
राठी हे 2015 ते 2020 या कालावधीत पाच वर्ष महेश सांस्कृतिक भवनाचे (Mahesh Sanskritik Bhavan) अध्यक्ष राहिले होते.
त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात संस्थेच्या प्रगतीचा आलेख नेहमीच उंचावत गेला.
याच कालावधीत संस्थेने मुकुंद नगर येथे भवनाच्या सॅनिटरीयमची जागा घेतली. त्यांच्यात अध्यक्षतेखाली या वास्तूच्या बांधकामाला सुरुवात झाली.

मितभाषी असलेले धनराज राठी हे नेहमी लोकांच्या गराड्यात वावरत होते. संस्थेच्या प्रगतीच्या आड ते कधी आले नाहीत.
स्पष्टवक्ते असलेले राठी यांनी कधीही कोणासोबत कपट केले नाही, सदैव दातृत्वाचा हात त्यांनी पुढे केला.
त्यांच्या निधनामुळे माहेश्वरी समाजाची फार मोठी हानी झाली असल्याची भावना समाजातील लोकांनी व्यक्त केली आहे.

Web Title : Pune News | Dhanraj Rathi, known as a philanthropist in Pune, passed away

हे देखील वाचा :

Rakesh Jhunjhunwala यांनी 3 दिवसात ‘या’ शेयरमध्ये कमावले 310 कोटी रुपये, तुम्ही सुद्धा केली आहे का गुंतवणूक?

Sameer Wankhede | NCB च्या वानखेडेंमागे पोलीस गुप्तहेर? पोलिस महासंचालकांकडे तक्रार

Govt. Part Time Employees | सरकारच्या अंशकालीन (पार्ट टाईम) कर्मचाऱ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या

Related Posts