IMPIMP

Pune Pimpri Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरला अटक

by nagesh
Pune Pimpri Crime | Police Raid On A One Spa Sangvi Police Station

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Pimpri Crime | पिंपळे सौदागर येथील एवन स्पा सेंटरमध्ये (A One Spa) सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश करत एका महिलेची सुटका केली, तर स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक (Arrest) केली. ही कारवाई (Pune Pimpri Crime) बुधवारी (दि.7) मध्यरात्री दीडच्या सुमारास करण्यात आली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मॅनेजर दत्तात्रय सुकवंत पवार (वय 34, रा. हंगरगा, ता. निलंगा), स्पा सेंटरचा मालकदेवीदास सुभाष दहिफळे (वय 33, रा. पाथर्डी रोड, चिंचपूर इजादे, अहमदनगर) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करून दत्तात्रय पवार याला अटक केली आहे. याबाबत अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्ष पिंपरी चिचंवड पोलीस नाईक गणेश सीताराम कारोटे (वय 36) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथील साई अ‍ॅम्बियन्स सोसायटीच्या (Sai Ambience Society) तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एवन स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय (Prostitution) सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खात्री करून स्पा सेंटरवर रात्री दीडच्या सुमारास छापा टाकला.
आरोपी पीडित महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते.
मिळालेल्या पैशातून आरोपी आपली उपजिविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक करून महिलेची सुटका केली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Pimpri Crime | Police Raid On A One Spa Sangvi Police Station

हे देखील वाचा :

Miraj Crime | मिरजमध्ये तरुणाचा धारदार हत्याने वार करून निर्घृण खून; परिसरात खळबळ

Supriya Sule | ‘हे अजिबात चालणार नाही’ ! संसदेत सुप्रिया सुळे आक्रमक

Maharashtra Karnataka Border Issue | पुण्यात कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी अनोखी पद्धत; इडली, सांबार आणि मसाला डोश्यावर…

Related Posts