IMPIMP

Rahul Gandhi Sabha In Pune | पुण्यात राहुल गांधींचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप, ”मोदी आपले नाहीत ते अदानीचे, सर्वात श्रीमंत 22 लोक सांगतात तेच ते ऐकतात”

by sachinsitapure

पुणे : Rahul Gandhi Sabha In Pune | शेतकरी उपाशी मरत आहे. शेतात पाणी नाही. महागाई वाढत आहे. याबद्दल ते कधीच बोलणार नाहीत. ते आपले नाहीतच, ते अदाणीचे आहेत. जे हिंदुस्थानचे सर्वात जास्त श्रीमंत बावीस लोक सांगतात तेच मोदी करतात, असा आरोप काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पुण्यातील जाहीर प्रचारसभेत बोलताना केला. (Pune Lok Sabha)

पुणे येथे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे (Congress Candidate) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची आज सायंकाळी प्रचारसभा झाली. यावेळी राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी आरक्षणाची पन्नास टक्केची मर्यादा हटवू, अशी घोषणा केली. तसेच मोदी सरकारला संविधान मिटवायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मोदींवर गंभीर आरोपांचा घणाघात करताना राहुल गांधी पुढे म्हणाले, मुंबईचा विमानतळ उचलून घेऊन गेले. सीबीआय, ईडीचा दबाव टाकला. नरेंद्र मोदींनी २२ लोकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांना सलग २४ वर्ष कर्जमाफी दिली तर जितके पैसे होतील तेवढे पैसे नरेंद्र मोदींनी या २२ लोकांना दिले, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

आरक्षण मर्यादा हटवण्याची घोषणा करताना राहुल गांधी म्हणाले, कधी त्यांचे नेते संविधान बदलण्याबद्दल बोलतात, तर कधी बोलतात, आरक्षण संपवून टाकणार. मोदींनी फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्यावे, त्यांनी कुठेही सांगावे की, ते ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार आहेत. पण आम्ही निर्णय घेतला आहे की, निवडणुकीनंतर आम्ही ही मर्यादा, ज्यामुळे कोट्यवधी नागरिकांचे नुकसान होत आहे, ती मर्यादा आम्ही तोडून टाकू आणि बाहेर फेकून देऊ, अशी सर्वात मोठी घोषणा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज पुण्यातील जाहीर प्रचारसभेत केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशात १५ टक्के दलित लोकसंख्या आहे, ८ टक्के आदिवासी आहेत, जवळपास ५० टक्के मागास वर्गाची लोकसंख्या आहे. या तिघांची एकूण टक्केवारी ही ७३ टक्के आहे. जनतेला सर्व माहिती आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले, लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी संविधान, लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस संविधान नष्ट करु इच्छित आहेत. हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. या संविधानात महात्मा फुले यांचे विचार आहेत.

जे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु ज्यांनी हिंदुस्तानच्या जनतेला वर्षानुवर्षे लढाई करुन दिले. नरेंद्र मोदी आणि भाजप संविधान बदलण्यासाठी इच्छुक आहेत.

संविधानाबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, याच संविधानामुळे भारताच्या गरीब, होतकरु, शेतकरी, मागास, दलित, अल्पसंख्याक, आदिवासींना अधिकार मिळतात. या संविधानाशिवाय काहीच नाही. जे काही तुमच्या हातात आहे ते सर्व देशाच्या फक्त २० ते २५ लोकांच्या हाती जाईल.

राहुल गांधी म्हणाले, मनरेगा बनले, भोजनाचा अधिकार, जमीन अधिग्रहन बिल, हरितक्रांती, धवलक्रांती, बँकांचे राष्ट्रीयकरण हे सर्व संविधानाने दिले आहे. भाजप ज्यादिवशी या संविधान नष्ट करेल, तेव्हा तुम्ही भारताला ओळखू शकणार नाहीत.

ही लढाई आहे. मी देशाला सांगू इच्छितो, जे आपल्याला बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी यांनी दिले त्याला आपण कधी संपू देणार नाही, अशी गर्जना राहुल गांधी यांनी पुण्यात केली.

Related Posts