IMPIMP

Raid On Dance Bar | डोंबिवली पूर्वमध्ये नंगा नाच सुरूच; बारवर छापा; 41 जणांना केली अटक

by nagesh
Raid On Dance Bar | dance tattered clothes and obscenity continues raid bar 41 arrested

डोंबिवली : सरकारसत्ता ऑनलाइन Raid On Dance Bar | मानपाडा पोलीस ठाण्याच्या (Manpada Police Station) हद्दीतील मोनालिसा बारमध्ये (Raid On Dance Bar) कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले गेले असल्याचे शुक्रावारी उघडकीस आले होते. हि घटना ताजी असतानाच बुधवारी ‘लोटस’ या लेडीज सर्विस बारवर कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने टाकलेल्या धाडीत त्याठिकाणी महिला विनामास्क होत्या तसेच तोकडया कपडयात ग्राहकांशी अश्लील कृती व हावभाव करताना निदर्शनास आल्या. यावेळी १० महिला, बार मॅनेजर आणि वेटर, १९ ग्राहक अशा ४१ जणांना ताब्यात घेण्यात आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

वरीष्ठ पोलिस निरिक्षक विलास पाटील (Senior Police Inspector Vilas Patil) यांना गुप्त बातमीदारमार्फत डोंबिवली (dombivli) पुर्वेकडील कल्याण-मानपाडा रोडवर (On Kalyan-Manpada road) असणाऱ्या ‘लोटस’ बारमध्ये कोरोनाचे नियमांचे उल्लंघन करून गाण्यांवर चाललेल्या महिलांच्या अश्लील हावभाव आणि कृत्याची माहिती मिळाली होती. महत्त्वाचे म्हणजे संबंधित बार व्यावसायिकाकडे परवाना नाही. पाटील यांच्या पथकाने छापा टाकलं त्यावेळी गैरकृत्य सुरू असल्याचे दिसून आले. तेथील महिलांच्या तोंडावर मास्क ही नव्हते तर सोशल डिस्टन्सचा फज्जा देखील उडाला होता. पोलिसांनी रोकड आणि गाणी वाजविण्याचे साहीत्य असा २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मानपाडा पोलिसांचा कानाडोळा ?

कल्याण पुर्वेकडील हाजीमलंग रोडवर असलेल्या मोनालिसा बारवर गेल्या आठवड्यात टाकलेल्या धाडीत महिला वेटर विनामास्क होते तर तोकडया कपडयात ग्राहकांशी अश्लील कृती व हावभाव करतानाही आढळून आल्या होत्या. या कारवाईत ५६ जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने लोटस बारवर धाड टाकून तेथील नंगा नाच उजेडात आणला आहे. महत्त्वाचे म्हणजे हे दोन्ही बार मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत. हे सर्व सुरु असल्याचे त्यांना माहित नाही किंबहुन ते याकडे का कानाडोळा करत होते हे मात्र उलगडले नसून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. नागरिकांनी त्यांच्या कार्यपध्दतीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

Web Title :- Raid On Dance Bar | dance tattered clothes and obscenity continues raid bar 41 arrested

हे देखील वाचा :

Multibagger Stocks | 11.95 रुपयांच्या ‘या’ शेयरमुळे गुंतवणुकदार झाले ‘मालामाल’, 6 महिन्यात 1 लाख झाले 3.09 लाख; तुमच्याकडे आहे का?

Captain Amarinder Singh Resigns | पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा राजीनामा

Pune Cantonment | पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची मोठी कारवाई ! पुलगेट परिसरातील दिल्ली दरबार, सुजाता मस्तानी, शेगाव कचोरी ‘सील’ बंद, जाणून घ्या प्रकरण

Related Posts