IMPIMP

Ram Temple Scam | ‘आरोप करणार्‍यांनो पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा’

by omkar
Ram temple scam

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था- अनेक नेते अयोध्येतील (Ayodhya) श्री राम मंदिर (Shri Ram Temple) निर्मितीसाठीच्या जमीन व्यवहारामध्ये घोटाळा (Ram temple scam) झाल्याचा आरोप करत आहेत. यावरून सर्वत्र वाद पेटला आहे.
जे नेते आरोप करत आहेत त्यांनी यापूर्वी रामभक्तांवर गोळ्या चालवल्या होत्या, असा हल्लाबोल खासदार साक्षी महाराज (MP Sakshi Maharaj) यांनी केला आहे.
तसेच, या आरोपावरून भाजपच्या खासदाराने एक मोठं वक्तव्य केलं आहे.
राम मंदिर निर्मितीसाठीच्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्यांनी देणगी दिल्याची पावती दाखवावी आणि दिलेली देणगी परत घेऊन जावी, असं विधान भाजपचे खासदार साक्षी महाराज (MP Sakshi Maharaj) यांनी केलं आहे. Ram temple scam ayodhya ram scam. mandir trust land dispute sakshi maharaj sanjay singh akhilesh yadav.

EPFO | नोकरी सुटल्यानंतर सुध्दा मिळेल ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या

आरोप करण्याव्यतिरिक्त दुसरं कोणतं काम शिल्लक राहिलेलं नाही

खा. साक्षी महाराज (Sakshi Maharaj) म्हणाले,
‘बाबरी मशिदीजवळ एक पाखरू देखील जाऊ देणार नाही असा उघड दावा करणाऱ्यांना खणखणीत उत्तर त्यावेळी त्यांना देण्यात आले होते.
श्री राम जन्मभूमीवर (Shri Ram Temple) आज एक भव्य मंदिर उभारलं जाणार आहे.
म्हणून अशा वायफळ लोकांकडून कोणता देखील आधार नसलेले आरोप करण्याव्यतिरिक्त दुसरं कोणतं काम शिल्लक राहिलेलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे साक्षी महाराज (Sakshi Maharaj) म्हणाले की,
श्री राम जन्मभूमी (Shri Ram Temple) तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय (Champat Rai) यांनी त्यांचं संपूर्ण जीवन भगवान श्री राम यांना समर्पित केलं आहे.
अशा व्यक्तीवर आरोप करणे अयोग्य आहे.

… ज्यांनी राम मंदिराला कठोर विरोध केला

आम आदमी पक्षाच्या संजय सिंह (Sanjay Singh) यांनी राम मंदिरासाठी (Shri Ram Temple) काही देणगी दिली असेल तर त्याची पावती त्यांनी दाखवावी आणि देणगी परत घेऊन जावी.
तसेच अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी देणगी दिली असेल तर ते देखील देणगी परत घेऊ शकतात.
असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे महाराज म्हणाले, हे तेच लोक आहेत ज्यांनी राम मंदिराला कठोर विरोध केला होता.

Barshi | बार्शीच्या मयूरने शोधला इन्स्टाग्रामचा बग; फेसबुकने दिले लाखोंचे बक्षीस

Related Posts