IMPIMP

Reserve Bank of India। बँकावर ‘अंकुश’ ठेवणार्‍या राजकारण्यांना धक्का; नगरसेवक, आमदार अन् खासदारांबाबत RBI चा मोठा निर्णय

by bali123
 Raigad Sahkari Bank | reserve bank of india rbi ban on raigarh sahkari bank of maharashtra due to irregularities

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Reserve Bank of India देशातील सर्वात वरिष्ठ बँक असणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सहकारी बँका, साखर कारखाने, पतपेढ्या यामध्ये अनेक राजकारणी मंडळींच्या हाती सत्ता असते, मात्र आरबीआयने (RBI) घेतलेल्या निर्णयानुसार आता अनेक राजकीय नेत्यांच्या हातून बँका सुटणार आहेत. तर, खासदार, आमदार, नगरसेवकांना आता सहकारी बँकांमध्ये (Cooperative Bank) व्यवस्थापकीय संचालक अथवा पूर्ण वेळ संचालक होता येणार नाही. अशा प्रकारच्या नियुक्त्या रोखण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) घेतला आहे. Reserve Bank of India | mp mla will not become director cooperative banks rbi issues new guidelines

सहकारी बँका, साखर कारखाने, पतपेढ्या यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची संख्या अधिक आहे.
संचालक पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता देखील RBI ने निश्चित केले आहे.
यानुसार, या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीकडे मास्टर्स किंवा अर्थक्षेत्रातील डिग्री आवश्यक असणार आहे. यावरून, सनदी लेखापाल, MBA (फायनान्स) किंवा बँकिंगमध्ये डिप्लोमा किंवा सहकारी व्यवहार व्यवस्थापनात डिप्लोमा असलेल्या व्यक्तीची नियुक्तीदेखील व्यवस्थापकीय संचालक
किंवा पूर्ण वेळ संचालक म्हणून केली जाऊ शकते. असं RBI ने म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या दरम्यान, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय किमान 35 वर्षे ते कमाल 70 वर्षे असावं.
अशी देखील वयाची अट घातली आहे. बँकिंग क्षेत्रात (Banking sector) वरिष्ठ अथवा मध्यम स्तरावर 8 वर्षे काम करण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तीचाही व्यवस्थापकीय संचालक किंवा पूर्ण वेळ संचालक पदासाठी विचार केला जाऊ शकतो.
सहकारी कंपनीमध्ये कोणतंही पद भूषवणाऱ्या व्यक्तींचा या पदासाठी विचार केला जाणार नाही.
दरम्यान, एका व्यक्तीची मुदत कमाल 5 वर्ष असणार आहे.
तसेच, त्याच व्यक्तीची फेरनिवड करता येऊ शकणार आहे.
परंतु, मात्र तो टर्म किमान तीन मध्ये अर्थात पूर्ण कार्यकाळ पंधरा वर्षांपेक्षा जास्त नसावा.
असं आरबीआयने सांगितलं आहे.

Web Title : Reserve Bank of India | mp mla will not become director cooperative banks rbi issues new guidelines

Related Posts