IMPIMP

Sambhaji Raje Chhatrapati | ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ या विधानावरून संभाजीराजे छत्रपतींनी अजित पवारांना ठणकावलं, म्हणाले…

by nagesh
Sambhaji Raje Chhatrapati | ajit pawar spoke wrongly about sambhaji maharaj say sambhaji raje

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter Session) बोलताना छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर (Dharmaveer) नव्हते ते स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते. त्यांच्या विधानानंतर भाजपच्या नेत्यांनी (BJP) आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर टीका केली आहे. तर काही ठिकाणी अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी निदर्शने केली जात आहेत. याच दरम्यान संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक (Swaraj Rakshak) आहेत तसेच धर्मरक्षक सुद्धा आहेत, असं म्हणत संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी अजित पवारांना ठणकावलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याला संरक्षण देण्यासाठी संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj), छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी यांनी त्यांचे रक्षण केले म्हणून छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्यरक्षक आहेत हे निश्चित आहे. तसेच संभाजी महाराजांनी धर्माचे सुद्धा रक्षण केले हे कोणीही नाकारत नाही. म्हणून संभाजीराजे धर्मरक्षक सुद्धा आहेत, हे म्हटलं तर चुकीचे नाही, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार अर्धसत्य बोलले

मी कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवातील संभाजी राजेंना धर्मवीर म्हणून संबोधतो. यापुढेही ते असेच राहणार आहे. अजित पवार म्हणतात संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. परंतु संभाजीराजे धर्मवीर आहेत याचे अनेक पुरावे आहेत. पवारांनी कोणत्या पुस्तकाचे वाचन करुन संभाजीराजे हे फक्त स्वराज्यरक्षक म्हटले ते सांगावे. ते अर्धसत्य बोलले आहेत. ऐतिहासिक संदर्भ देताना पुस्तके वाचून द्यावे, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

विकृत बोलून वाद निर्माण केले जातात

सभागृहामध्ये आमदार जे बोलत असतात ते अधिकृत असते. परंतु याठिकाणी बोलताना अभ्यासपूर्ण बोलणे गरजेचे आहे. सर्व पुढाऱ्यांनी सध्याचा कालखंड पाहून मागील 300 वर्षाची उदाहरणे देणे चुकीचे आहे. आपल्याकडे मोठा इतिहास आहे. परंतु विकृत बोलून वाद निर्माण केले जातात. हे पुढाऱ्यांना शोभत नाही, असा टोला संभाजीराजे छत्रपती यांनी लगावला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुण्यातील स्मारकाला किती फंड दिला?

पुण्यात संभाजीराजे यांच्या स्मारकासाठी किती फंड दिला यावर बोला, धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक यावर बोलू नका.
जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकात देखील संभाजीराजे धर्मवीर असल्याचे आहे.
अरबी समुद्रात शिव स्मारकाचे अद्याप काम सुरु नाही यावर काही बोलणार नाही.
पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले ते काम पूर्ण का झाले नाही हे सरकारने सांगावे,
असा हल्लाबोल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

Web Title :- Sambhaji Raje Chhatrapati | ajit pawar spoke wrongly about sambhaji maharaj say sambhaji raje

हे देखील वाचा :

Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला 10 वर्षे सक्तमजुरी

Pune News | अभिनव रात्रशाळा… ऐतिहासिक वारसा आणि वर्तमानाचे भान

Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचे बारामतीत पडसाद; बारामतीतील घरासमोर त्यांचा पुतळा जाळून व्यक्त केला निषेध

Related Posts