IMPIMP

पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! SBI च्या ‘या’ सर्व्हिसद्वारे घसरबसल्या मिळतील ‘या’ सर्व सुविधा; जाणून घ्या

by nagesh
SBI Tax Saving Scheme | sbi fd scheme how much you will gain on maturity with 5 lakh rupees lump sum deposit check tax benefits and other details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  SBI | एसबीआयने (SBI) पेन्शनधारकांसाठी वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. SBI चे ज्येष्ठ नागरिक ग्राहक आता https://www.pensionseva.sbi/ वर जाऊन पेन्शनसंबंधी सर्व माहिती मिळवू शकतात. परंतु अगोदर येथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर लॉगइन करून वापर करू शकता. स्टेट बँकेंने ट्विट करून वेबसाइटबाबत सांगितले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

वेबसाइटवर मिळतील या सुविधा

1. या वेबसाइटवर यूजर्स एरियर कॅलक्युलेशन शीट डाऊनलोड करू शकतात.

2. पेन्शन स्लिप किंवा फॉर्म 16 सुद्धा डाऊनलोड करू शकतात.

3. पेन्शन प्रोफाईल डिटेलची माहिती येथे उपलब्ध होईल.

4. गुंतवणुकीची माहिती मिळेल.

5. लाईफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीच्या दाखल्याचे स्टेटस सुद्धा तपासता येईल.

6. बँकेत केलेल्या ट्रांजक्शनची माहितीसुद्धा या वेबसाइटवर मिळेल.

वेबसाइटवर रजिस्ट्रेशननंतर मिळतील या सुविधा

या वेबसाइटवर रजिस्ट्रेशननंतर जेव्हा तुमच्या खात्यात पेन्शन येईल, त्याची माहिती तुमच्या फोन नंबरवर दिली जाईल.

ब्रँच लाईफ सार्टिफिकेटची सुविधासुद्धा मिळेल.

पेन्शन स्लिप मेलद्वारे दिली जाईल.

यासोबतच स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत आपले लाईफ सर्टिफिकेट सबमिट करता येईल.

हेल्पालाईनवर करू शकता तक्रार –

वेबसाइट ऑपरेट करताना ज्येष्ठांना कोणतीही समस्या येऊ नये यासाठी एसबीआयने हेल्पलाइन नंबरसुद्धा जारी केला आहे. काही समस्या आल्यास एरर स्क्रीन शॉटसह [email protected] वर तक्रार ईमेल करू शकता.

एसएसएम सेवा आणि कस्टमर केयर नंबर

याशिवाय 8008202020 नंबरवर UNHAPPY टाईप करून एसएमएससुद्धा करू शकता. सोबतच बँकेने कस्टमर केयर नंबर 18004253800/1800112211 किंवा 08026599990 सुद्धा जारी केला आहे, ज्यावर कॉल करून समस्या सांगू शकता.

Web Title : SBI | sbi pension seva check benefits registration process and other details here

हे देखील वाचा :

Weather Alert | हवामान विभागाचा अलर्ट ! 18 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये होईल जोरदार पाऊस, ‘वीज’ कोसळण्याची शक्यता

Corona दरम्यान Sepsis चा वाढला धोका, कॅन्सर आणि हार्टअटॅकने सुद्धा जाऊ शकतो जास्त लोकांचा जीव

Coronavirus | घराच्या आत 6 फुटाचे अंतर ठेवून सुद्धा पसरू शकतो ‘कोरोना’, संशोधनात दावा

Related Posts