IMPIMP

Smriti Irani In Pune | स्मृती इराणींच्या कार्यक्रमात BJP च्या कार्यकर्त्यांकडून NCP च्या महिला पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण

by nagesh
Smriti Irani In Pune | bjp activists beat up a woman ncp office bearer at smriti iranis program

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Smriti Irani In Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रवक्त्याला (BJP
Spokesperson) मारहाण (Beaten) केल्याची घटना ताजी असतानाच भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची
घटना घडली आहे. बालगंधर्व सभागृह (Balgandharva Hall) येथील केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या
राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. सध्या घटनास्थळी कडेकोट पोलिसांचा (Pune Police) बंदोबस्त तैनात करण्यात
आला आहे. स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Smriti Irani In Pune)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

स्मृती इराणी या एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. महिलांना पुढे करुन राष्ट्रवादी घाणेरडे राजकारण करत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त असताना या महिला कार्यक्रमात कशा आल्या, असा प्रश्न भाजपकडून विचारला जात आहे. (Smriti Irani In Pune)

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी याचा कार्यक्रम असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या कार्यक्रमस्थळी कशा आल्या हा प्रश्न निर्माण होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हे एक षडयंत्र असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. ‘अमित शाह (Amit Shah) आणि भाजपची वाटचाल’ या मराठीत अनुवादीत पुस्तकाचा प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुण्यातील बालगंधर्व सभागृहात पार पडला.

 

Web Title :- Smriti Irani In Pune | bjp activists beat up a woman ncp office bearer at smriti iranis program

हे देखील वाचा :

Constipation Cure Tips | बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी ‘या’ 4 गोष्टी आहारात समाविष्ट करा; जाणून घ्या

Home Remedies To Stop Hair Fall | ‘या’ दोन गोष्टी लक्षात ठेवल्यास त्वचा आणि केस होतील सुंदर; जाणून घ्या

Narayan Rane on Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते’ – नारायण राणे

Related Posts