IMPIMP

Social Media Posts | सोशल मीडियावरून मिळू शकते घसघशीत पगाराची नोकरी, फक्त पोस्टमध्ये करू नका ‘या’ 5 चूका; जाणून घ्या

by nagesh
Social Media Posts | tips to get job 5 common mistakes you should stop making in your social media posts

 नवी दिल्ली : Social Media Posts | सोशल मीडिया आता आपल्या जीवनाचा भाग झाला आहे. सोशल मीडियाची कक्षा आता इतकी वाढली आहे की लोक येथे नोकरीच्या शोधासाठी सुद्धा येतात. कंपन्या सुद्धा हायरिंगपूर्वी कँडिडेटबाबत सोशल मीडियावरून खुपकाही माहिती जमवतात. अशावेळी जर तुम्ही एक अ‍ॅक्टिव्ह सोशल मीडिया यूजर आहात आणि दररोज काही ना काही पोस्ट (Social Media Posts) करत असाल तर तुम्हाला इंग्रजीच्या काही चूकांपासून दूर राहिले पाहिजे.

या चूकांमुळे तुमच्या पोस्टचा (Social Media Posts) इम्पॅक्ट आणि परिणाम कमी होतोच शिवाय तुम्हाला लोक सहजपणे घेऊ लागतात. इतके की लोक तुमच्या पोस्टकडे दुर्लक्ष करू लागतात.

यासाठी सोशल मीडियावर, (Facebook, Instagram, Twitter, Pinterest किंवा इतर कुठेही) तुम्ही नेहमी भाषा, व्याकरण आणि इमोटिकोन्सच्या चूका करत असाल तर त्या ताबडतोब थांबवा. येथे आम्ही तुम्हाला अशा काही कॉमन चूकांबाबत सांगणार आहोत…
1. Your आणि you’re मध्ये कंफ्यूजन

सोशल मीडियावर ही चूक खुप जणांकडून होते. Your चा अर्थ होतो तुमचा. तर You’re चा अर्थ होतो तुम्ही आहात. हा you are चा शॉर्ट फॉर्म आहे.

2. Its आणि it’s मध्ये चूक

दोन्ही एकसारखे आहेत. परंतु दोन्हीचा अर्थ आणि वापराची पद्ध वेगळी आहे. Its चा वापर थर्ड पर्सनमध्ये पझेसिव्ह केससाठी होतो. जसे की बाकी पझेसिव्ह शब्दांचा वापर होतो his, her, their, इत्यादी. जसे की The baby lay on its front. तर It’s चा वापर it is च्या ठिकाणी होतो. याचा वापर असा करू शकता – It’s a sunny day today.

 3. Two, to आणि too

बोलताना तीनही एकसारखेच वाटतात. परंतु तिघांचा अर्थ खुप वेगळा आहे. जिथे Two एक नंबर आहे, तर To चा वापर डायरेक्शन सांगण्यासाठी किंवा कोणत्याही क्रियेसोबत लावले जाऊ शकते. याचे अनेक वापर आहेत. Two आणि To च्या वापराचे उदाहरण जाणून घ्या- I have two books with right now तर To चा वापर अशाप्रकारे होईल – I will be going to the market today.

तर Too चा अर्थ सुद्धा आहे. My sister wanted to come along too म्हणजे माझ्या बहिणीला सुद्धा माझ्याबरोबर यायचे आहे.

4. चूकीच्या इमोटिकॉनचा वापर

इमोटिकॉन ज्यास स्मायली सुद्धा म्हणतात. याचा वापर आपण पोस्टमध्ये सर्वात जास्त करतो. परंतु अनेकदा याचा वापर सुद्धा चुकीच्या ठिकाणी केला जातो, ज्यामुळे वाचणार्‍यापर्यंत ती भावना पोहचत नाही. जसे की तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत दुखी आहात आणि आपले दुख दाखवण्यासाठी रडतानाच्या इमोटिकॉनऐवजी साईडला घामाचा थेंब असलेला इमोटिकॉन शेयर करता. यामुळे तुम्ही जे म्हणत आहात त्याचा अर्थच बदलतो.

आपल्या भावना दर्शवण्यासाठी इमोटिकॉनचा वापर करणेच चुकीचे आहे.
त्याऐवजी आपल्या दोन शब्दांचा वापर करणे चांगले ठरते.

5. शॉर्ट फॉर्मचा वापर

SMS ची भाषा आता सोशल मीडियापर्यंत सुद्धा पोहचली आहे.
यासाठी great च्या ऐवजी gr8 लिहू लागले आहेत. तर LOL, ROFL, LMAO आणि अशाच अनेक शॉर्टफॉर्मचा वापर होत आहे.
हे तुम्हाला कूल वाटू शकते, परंतु रिडर्सला हे चांगले वाटत नाही.
असंख्य असे वाचक असतात त्यांना हे तुमचे शॉर्टफॉर्म समजत नाहीत.
यासाठी सोशल मीडियावर त्यांचा वापर करणे चुकीचे आहे.

Web Titel :- Social Media Posts | tips to get job 5 common mistakes you should stop making in your social media posts

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा 

Pune Crime | पुण्याच्या रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून कोटयावधीचं सोनं चोरणार्‍या 2 महिला अन् लहान मुलगा CCTV मध्ये कैद, पाहा व्हिडीओ

Punjab New CM | …म्हणून अंबिका सोनींनी नाकारली सोनिया गांधींकडून आलेली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ‘ऑफर’

e-Shram पोर्टलला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद ! आतापर्यंत 1 कोटी कामगारांनी केले रजिस्ट्रेशन; 38 कोटी कामगारांना होईल फायदा

Related Posts