IMPIMP

ST Employees Protest | ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागचा सूत्रधार शोधणार, दोषींवर कारवाई करणार’, गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती

by nagesh
Dilip Walse Patil On Silver Oak Attack | silver oak attack police did not provide adequate security despite intelligence report home minister walses big statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनएसटी महामंडळाचे (ST Corporation) राज्य शासनात (Maharashtra State Government) विलीनीकरण (MSRTC Merger) करावं या मागणीसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employees Protest) थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ (Silver Oak) या निवासस्थानी धडक दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पल फेक करण्यात आली. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषाबाजी केली. या आंदोलनामागे (ST Employees Protest) कोण आहे? याचा शोध घेऊन कारवाई करणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, अचानक आणि दुर्दैवी घडलेली (ST Employees Protest) घटना आहे. इतक्या ज्येष्ठ नेत्याच्या घरी अशा प्रकारे हल्ला (Attack) करणं निश्चितच काळजी करण्याची गोष्ट आहे. यामध्ये इंटेलिजन्सचं फेल्युअर (Failure of intelligence) कुठे झालं याबाबत निश्चितच माहिती घेतली जाईल. याबाबत पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey), सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (joint Commissioner, Law and Order, Vishwas Nangre Patil) यांना सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई (Strict Action) करण्यात येईल.

दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले, न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आणि आज अचानक हल्ला केला.
हे मला वाटतं की, ठरवून केलेली घटना आहे. यामागे कुठलीतरी अज्ञात शक्ती असल्याशिवाय अशी घटना घडणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांना माझे एवढंच आवाहन आहे की, न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार त्यांनी कामावर हजर व्हावे. सरकारने त्यांना पूर्ण आश्वासन दिलं आहे की, आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही. जर काही प्रश्न असतील तर चर्चा करुन मार्ग काढला जाईल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ते खरंच आंदोलक होते का?
एसटी कामगारांच्या आडून काही राजकीय शक्ती हिंसा घडविण्याचे काम करत आहेत. महिलांना पुढे करुन मॉब तयार करण्यात आला आहे.
यामुळे पोलिसांना कारवाई करता आली नाही. खरंच आंदोलक होते का? याचा शोध घेतला जाणार आहे, असेही वळसे पाटील म्हणाले.
दरम्यान, या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)
आणि इतर मंत्री शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

Web Title :- ST Employees Protest | st employees protest outside ncp chief sharad pawar house home minister dilip walse patil said will investigate and take action

हे देखील वाचा :

Narayan Rane | नारायण राणेंचा सेनेवर निशाणा, म्हणाले – ‘पैसा खाणे शिवसेनेचा धर्म, शिवसैनिकांना दमडी तरी मिळाली का?’

Insulin Plant For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांना इन्सुलिन देते ही वनस्पती, केवळ 1 पान चावल्याने कंट्रोल होईल Blood Sugar

Summer Detoxification | उन्हाळ्यात बॉडी हेल्दी ठेवणे आणि डिटॉक्सफिकेशनसाठी अशाप्रकारचा डाएट करा फॉलो

Related Posts