IMPIMP

Supreme Court | न्या. नागरत्ना पहिल्या महिला सरन्यायाधीश होणार?

by nagesh
Supreme Court | collegium sent recommendation of 9 names for appointment in supreme court the country may get the first woman chief justice

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाSupreme Court | सर्वोच्च न्यायालयात नऊ जागा रिक्त असून त्याची नियुक्ती प्रक्रिया सुरु करण्यात आली (Supreme Court) आहे. मंगळवारी ४८ वे सरन्यायाधीश न्या. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली कॉलेजियमची बैठक पार पडली. त्यामध्ये नऊ न्यायाधिशांच्या नावांवर शिक्का मोर्तब करण्यात आले असून त्या न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस केंद्र सरकारला पाठवण्यात आली. यामध्ये शिफारशीमध्ये तीन महिला न्यायाधीशांच्या नावाचाही समावेश असून एका ज्येष्ठ वकीलांची थेट न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्तीसाठी शिफारसही करण्यात आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

केंद्राकडे शिफारस करण्यात आलेल्या नावांमध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती हिमा
कोहली, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, गुजरात उच्च न्यायालयाच्या
न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ए एस ओका, गुजरात उच्च
न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विक्रम नाथ, सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे के
माहेश्वरी, केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी टी रवींद्रकुमार, मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
एम एम सुंदरेश यांच्या नावाचा समावेश आहे. तर ,ज्येष्ठ वकील पी एस नरसिंह यांच्या नावाची थेट
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदासाठी शिफारस करण्यात आली आहे.

केंद्राने जर कॉलेजियमकडून करण्यात आलेल्या शिफारशी मान्य केल्या तर न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि पी एस नरसिंह यांना भारताच्या सरन्यायाधीश पदाची संधी मिळू शकते. देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशपदी पहिल्या महिला सरन्यायाधीश म्हणून बी व्ही नागरत्ना यांना संधी मिळणार आहे.

Web Title :  Supreme Court | collegium sent recommendation of 9 names for appointment in supreme court the country may get the first woman chief justice

हे देखील वाचा :

Maharashtra Government | पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना 5 ते 6 % व्याजदराने कर्ज पुरवठा; जाणून घ्या कोणाचा होणार फायदा

Pune Crime | महाराष्ट्र एल्गार सेनेच्या अध्यक्षा विष्णू कुऱ्हाडेवर खंडणीचा FIR

Closed Currency | 2 रुपयांचे ‘हे’ नाणे बदलू शकते तुमचे नशीब, मिळू शकतात लाखो रुपये; जाणून घ्या कसे

तात्काळ अपडेट करा तुमचा Smartphone, आता हसून उघडू शकता फोनचा कॅमेरा; तोंड उघडल्यावर दिसतील मेसेज

Related Posts