Uttam Nagar Pune Crime News | पुणे: खोटी तक्रार दाखल करणे भोवले, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
पुणे : – Uttam Nagar Pune Crime News | जाणीवपूर्वक अडकवण्यासाठी खोटी अदखलपात्र तक्रार पोलिसांकडे देऊन मानसिक त्रास दिल्या प्रकरणी एका राजकीय पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन उत्तमनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत (Atrocity Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलेले कुणाल सुनिल सरवदे (वय-34 रा. मु.पो. बहुली ता. हवेली, जि. पुणे) यांनी उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
सरवदे यांच्या तक्रारीवरुन बाळासाहेब बबनराव बराटे Balasaheb Babanrao Barate (वय 52, मातोश्री बंगला, वनदेवी मंदिरासमोर, कर्वेनगर, पुणे) यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब बराटे यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात कुणाल सरवदे यांच्या विरोधात अदखलपात्र तक्रार दाखल केली होती. संबंधित तक्रार पूर्णपणे खोटी व मनस्ताप जनक आहे. पोलिसांना प्राप्त कायदेशीर अधिकाराचा उपयोग करुन कारवाई करण्यास लावण्याच्या उद्देशाने ही तक्रार केली आहे. बराटे यांच्या तक्रार अर्जामुळे विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये जावे लागले. त्यामुळे आपल्याला प्रचंड मनस्ताप व वेदना सहन कराव्या लागल्या. आपण अनुसूचित जातीतील असल्याचे माहीत असताना जाणीवपूर्वक बराटे यांनी खोटी तक्रार दाखल करुन मानसिक त्रास देत बदनामी केली असे सरवदे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. कुणाल सरवदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन उत्तमनगर पोलिसांनी बाळासाहेब बराटे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त रंगनाथ उंडे (ACP Rangnath Unde) करत आहेत.
Comments are closed.