IMPIMP

Wipro Ends Work From Home | ‘विप्रो’ने 18 महिन्यानंतर बंद केले कर्मचार्‍यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’, 55 % कर्मचार्‍यांचं झालंय लसीकरण; आजपासून उघडली कार्यालये

by nagesh
Wipro Ends Work From Home | wipro work from home wfh ends india offices reopen wipro wfh policy extension

नवी दिल्ली : वृत्तसंस्था विप्रो (Wipro) ने आपल्या कर्मचार्‍यांसाठी घरातून काम बंद (work from home shutdown) करण्याची घोषणा केली आहे, कारण देश सामान्य स्थितीत परत येत आहे. विप्रोचे चेयरमन ऋषद प्रेमजी (Wipro chairman Rishad Premji) यांनी म्हटले की, कोविड-19 (Covid-19)च्या स्थितीमुळे 18 महिन्यानंतर कार्यालये पुन्हा सुरू होतील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

त्यांनी ट्विट केले की, 18 महिन्यांच्या दिर्घ कालावधीनंतर, आमचे लोक सोमवारपासून आठवड्यात दोनवेळा कार्यालयात परत येत आहेत. सर्व पूर्णपणे लसीकरणासाठी तयार आहेत, सर्व जाण्यासाठी तयार आहेत – सुरक्षित आणि सामाजिक प्रकारे अंतर राखून आहेत. हे आम्ही जवळून पाहू.

प्रेमजी यांनी 59 सेकंदाचा एक व्हिडिओ शेयर केला, ज्यामध्ये दाखवण्यात आले आहे की, कॅम्पस आपल्या कर्मचार्‍यांच्या स्वागतासाठी किती चांगल्याप्रकारे तयार आहे आणि तापमान चाचणी आणि क्यूआर स्कॅनच्या माध्यमातून अनेक चेक पॉईंटवर त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.

विप्रोच्या वार्षिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, महामारी पसरल्यानंतर कंपनीने घरातून कामकाज लवकर सक्षम करण्यासाठी आपल्या व्यावसायिक सातत्याच्या योजना सुरू केल्या होत्या. कंपनीचे जगभरातील कर्मचार्‍यांपैकी तीन टक्केपेक्षा कमी कर्मचारी कार्यालयातून काम करत होते.

प्रेमजी यांनी रिपोर्टमध्ये म्हटले,
आम्ही काम करण्याच्या या नवीन पद्धतीत चांगल्या प्रकारे स्थिर झालो आहोत आणि आमच्या ग्राहकांना यशस्वी बनवणे सुरू ठेवले आहे.
आम्ही त्यांच्या आत्मविश्वासाचा आनंदा घेतो.
हायब्रिड मॉडलमध्ये भविष्यात आम्ही कसे काम करू शकतो, याबाबत मला शंका नाही.

14 जुलै रोजी विप्रोच्या 75 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रेमजी यांनी सांगितले होते की,
भारतात काम करणार्‍या आमच्या सुमारे 55 टक्के कर्मचार्‍याचं लसीकरण झाले आहे.
विप्रोमध्ये सध्या जवळपास 2 लाख कर्मचारी-अधिकारी काम करतात.

Web Title :- Wipro Ends Work From Home | wipro work from home wfh ends india offices reopen wipro wfh policy extension

हे देखील वाचा :

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत घसरणीने खरेदीदार खुश ! आता 27501 रुपयात मिळतंय 10 ग्रॅम Gold, जाणून घ्या नवीन दर

T20-ODI Captaincy | T20 विश्वचषकानंतर विराट कोहली सोडणार कर्णधारपद, रोहित शर्मा सांभाळणार भारतीय संघाची सूत्रे – रिपोर्ट

High Security Number Plate | कामाची गोष्ट ! तुमच्या वाहनावर नसेल ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’, तर ‘या’ 11 कामांमध्ये येईल अडथळा; जाणून घ्या

Related Posts