IMPIMP

Indrani Balan Foundation | पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे 23 ऑक्टोबर पासून आयोजन

by nagesh
Indrani Balan Foundation | The first 'Indrani Balan Winter T20 League' cricket tournament; The game changers celebrated the opening day

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Indrani Balan Foundation | स्पोर्टस्फिल्डस् मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ (Indrani Balan Winter T20 League) अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत १० संघ सहभागी होत असून स्पर्धेत दोन लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचा प्रारंभ शनिवार, २३ ऑक्टोबर २०२१ रोजी लिजंडस् क्रिकेट मैदान, मुंढवा येथे होणार (Indrani Balan Foundation) आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पोर्टस्फिल्डस् मॅनेजमेंटचे संचालक सनी मारवाडी (Sunny Marwadi) यांनी सांगितले की,
नुकताच इंडियन प्रिमिअर लीग (IPL) स्पर्धेचा थरार संपुष्टात आला आहे. जागतिक टी-२० स्पर्धेचे पडघम वाजायला लागले असून २३ ऑक्टोबर पासून ही रोमहर्षक स्पर्धा सुरू होणार आहे.
त्यामुळे सगळेच वातावरण हे क्रिकेटमय होणार आहे. करोना महामारीच्या संकटानंतर सर्वांचेच जीवन पुर्वपदावर येऊ लागले असून युवा क्रिकेट खेळाडूंसाठी तसेच त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी, संधी देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेला माणिकचंद ऑक्सिरीच यांचे प्रायोजक्त्व लाभले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुण्यातील खेळाडुंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्या विंटर स्पर्धेत स्थानिक क्रिकेट क्लब आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील १० संघ झाले आहेत.
साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या या स्पर्धेत एकूण दोन लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
कोविड-१९ या महामारीच्या संकटानंतर आमच्यावतीने पहिल्यांदाच अशी स्पर्धा होत असून खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य तसेच समृध्दीसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे.
असे सनी मारवाडी यांनी स्पष्ट केले. स्पर्धेचे सामने फक्त शनिवारी आणि रविवारी खेळवण्यात येणार आहेत.

पुनित बालन ग्रुप (punit balan group) , गेम चेंजर्स, व्हिज्डम क्रिकेट अ‍ॅकॅडमी, फ्रेन्डस् क्रिकेट क्लब, वैकिंज् क्लब, शिरूर जिमखाना क्लब, आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी,
कल्याण क्रिकेट क्लब, फार्मा इलेव्हन, पुणे सी.ए. संघ या १० संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
लाल चेंडूवर होणार्‍या या स्पर्धेत ४५ साखळी सामने होणार आहेत.
स्पर्धेचा अंतिम सामना फेब्रुवारी मध्ये होणार आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

स्पर्धेतील विजेत्या संघाला ८१ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला ४१ हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे.
या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांना प्रत्येकी ३ हजार रूपये आणि करंडक तर,
मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला ५ हजार रूपये करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या (Indrani Balan Foundation) अध्यक्षा जान्हवी धारीवाल (janhvi dhariwal) यांच्या हस्ते शनिवारी, २३ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे.

 

Web Title : Indrani Balan Foundation | First Indrani Balan Winter T20 League Championship to be held from October 23

 

हे देखील वाचा :

Nagpur Crime | नागपुरमध्ये 4 मित्रांनी फिल्मी स्टाईलने केला जिवलग मित्राचा ‘गेम’

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 89 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts