IMPIMP

Pune Crime | सराफाचे लक्ष विचलित करुन दागिने लंपास करणाऱ्याला फरासखाना पोलिसांकडून तासाभरात अटक

by bali123
pune crime | pune police and nagar police arrested two thieves for stealing rs 97 lakh

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | सराफ दुकानात येऊन दागिने खरेदी करण्याचा बहाणा करुन दुकानमालकाची नजर चुकवून दागिने चोरुन नेणार्‍यास फरासखाना पोलिसांनी (faraskhana police) अवघ्या तासाभरात पकडले. त्याला अटक (Pune Crime) करण्यात आली आहे. विनय प्रकाश पावटेकर (रा. सिडको, औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याप्रकरणी फुलचंद खुमचंद ओसवाल (वय 62, रा. मार्केटयार्ड) यांनी फरासखाना पोलिसांकडे (faraskhana police) फिर्याद दिली होती. ओसवाल यांचे रविवार पेठेत नाकोडा गोल्ड अँड सिल्व्हर नावाचे दुकान आहे. 9 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता विनय पावटेकर हा सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात आला. त्याने तेथील सोनाराचे लक्ष विचलित करुन 70 ग्रॅम वजनाची दोन सोन्याची मंगळसुत्रे चोरुन नेली होती. फरासखाना तपास पथक या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार महावीर वलटे व राकेश क्षीरसागर यांना आरोपी कसबा पेठेतील फणी आळी येथे थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जाऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासामध्ये आरोपीला अटक करुन गुन्हा उघडकीस आणला. विनय पावटेकर याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने खडक पोलीस (Khadak Police) ठाण्याच्या हद्दीतील व्यापार्‍याचे सोने चोरी केल्याचे सांगितले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे (deputy commissioner of police
priyanka narnaware),
सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर (assistant commissioner of police satish govekar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (senior police inspector rajendra landge)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, पोलीस अंमलदार महावीर वलटे,
राकेश क्षीरसागर, मेहबुब मोकाशी, सचिन सरपाले, रिजवान जिनेडी, ऋषिकेश दिघे, अभिनय चौधरी,
वैभव स्वामी, शरद वाकसे, मोहन दळवी या पथकाने केली.

Web Title : pune crime | faraskhana police arrest criminal within hour

Rain in Maharashtra | विकेंडनंतर राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Fact Check | Tokyo Olympics मध्ये ‘गोल्ड मेडल’ जिंकण्याच्या खुशीमध्ये भारत सरकार देतंय 12 महिन्यांचा Free Recharge? जाणून घ्या ‘सत्य’

Cyberchondria | इंटरनेटवर आजारांबाबत शोध घेण्याने वाढून शकते तुमचे आजारपण, जाणून घ्या कसे? 

Related Posts