मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai Suicide) यांनी कर्जत येथील आपल्या एन डी स्टुडिओमध्ये (ND Studio) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलीवूडमध्ये (Bollywood News) आपल्या कामाने नावाजलेले नितीन देसाई (Nitin Desai Suicide) यांनी केलेल्या या कृत्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे नितीन देसाई हे चित्रपट दिग्दर्शन तसेच कला दिग्दर्शक (Film Director) म्हणून नावाजले गेले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलीचा विवाह कर्जत येथील त्यांच्या एन डी स्टुडिओत थाटामाटात साजरा झाला होता. एन डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांचे निवासस्थान आहे. तेथेच त्यांनी आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे.
चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितीन देसाई (Nitin Desai Suicide) यांनी मुंबईतील सर जे जे कला महाविद्यालयातून (Sir JJ College of Arts) प्रकाश चित्रणाचे प्रशिक्षण घेतले होते. १९८७ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९४२ अ लव्ह स्टोरी या चित्रपटापासून ते प्रकाश झोतात आले. त्यानंतर हम दिल दे चुके सनम, देवदास, लगान, जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो अशा अनेक सिनेमाचे कला दिग्दर्शन त्यांनी केले होते.
कर्जत येथे त्यांनी एन डी स्टुडिओ उभारला असून तेथे जोधा अकबरसाठी किल्ल्याचा मोठा सेट उभारला होता.
मध्यतरी त्याला आग लावून तो खाक झाला होता.
नितीन देसाई यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळविला होता.
तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळविला आहे.
कर्जत येथील ५२ एकरात पसरलेल्या एन डी स्टुडिओमध्ये अनेक कार्यक्रम होत होते.
कलर्सचा रिअॅलिटी शो, बिग बॉस यासारखे कार्यक्रम तेथे आयोजित केले जात होते.
मराठी कलावंतांसाठी ते एक मोठा आधार होते. अनेक मराठी चित्रपटांचे शुटिंग तेथे होत असे.
Web Title : Nitin Desai Suicide | nitin desai wel known marathi art director ends life in n d studio at karjat
हे देखील वाचा