IMPIMP

Pune Crime News | पुणे : जुन्या वादातून तरुणाचा पाठलाग करुन निघृण खून, गुन्हे शाखेकडून 5 जणांना अटक (Video)

by sachinsitapure

पुणे :  – Pune Crime News | महिन्याभरापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून डहाणूकर कॉलनी (Dahanukar Colony Kothrud) परिसरात एका 22 वर्षीय तरुणाचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला. सहा जणांच्या टोळक्याने कट रचून घेरले आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत खून केला (Murder In Pune). गुरुवारी (दि.16) मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) खंडणी विरोधी पथक (Anti Extortion Cell Pune) एकने फरार झालेल्या पाच जणांना अटक केली आहे.

श्रीनु शंकर विसलावत (वय-22 रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी, कोथरुड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. एका अल्पवयीन तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली असून अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार प्रवीण दत्ता कदम (वय 22 रा. लेन नंबर 1, कर्वेनगर वडार वस्ती, रमेश प्रोविजन स्टोअरच्या जवळ, पुणे), गौरव शंकर माने (वय 17 रा. लेन नंबर 1, कर्वेनगर वडार वस्ती, रमेश प्रोविजन स्टोअरच्या जवळ, पुणे), अजय उर्फ सचिन आप्पा जाधव (वय 18 वर्षे, रा. लेन नंबर 1, कर्वेनगर वडार वस्ती, रमेश प्रोविजन स्टोअरच्या जवळ, पुणे), रोहन कल्याण अडागळे (वय 18 रा लेन नंबर एक कर्वेनगर वडार वस्ती रमेश प्रोविजन स्टोअरच्या जवळ पुणे), अथर्व लक्ष्मण शेळके (वय 20 रा. डहाणकर कॉलनी, लक्ष्मी नगर, लेन नंबर 18, कोथरूड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना खंडणी विरोधी पथक 1 चे पोलीस नाईक राजेंद्र लांडगे यांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी दळवीनगर, आंबेगाव बुद्रुक येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या कारणामुळे वर नमूद इसमाचा खून केले बाबत कबुली दिली आहे. पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर 12 तासात आरोपींना अटक केली आहे. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी अलंकार पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील तांबे, शाखा, पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक यशवंत ओंबासे, पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, अमोल आवाड, नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, मयूर भोकरे, मधुकर तुपसुंदर यांच्या पथकाने केली.

Related Posts