IMPIMP

Pune Crime News | पैशांच्या व्यवहारातून दोघांचे अपहरण करुन केली मारहाण, मध्यरात्री रंगला होता थरार; पुणे पोलिसांकडून कोल्हापूरच्या आरोपींना केली अटक

by bali123
Pune Crime | Shivajinagar police arrest a notorious criminal who stole a rickshaw in Pune city

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Crime News | 40 लाखांच्या व्यवहारातून पैसे घेतलेल्या तरुणाच्या दोन मित्रांचे अपहरणकरून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुदैवाने पोलिसांना प्रकरण तात्काळ समजले आणि त्यांनी अपहरण झालेल्या त्या तरुणाची दोघांच्या तावडीतून काही तासात सुटका केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. Pune Crime News | pune kidnapping news the two were abducted and beaten in a money transaction sinhagad road police arrested the accused from kolhapur

अविनाश पांडुरंग पाटील (Avinash Pandurang Patil) (वय 31) आणि उत्तम तुरूंम्बकर (Uttam Turumbakar) (वय 31) या दोघांना अटक (Arrest) केली आहे. तर याप्रकरणी निखील उदय गुरव (वय 26) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यात प्रभात तोडकर (वय 27) याची व संदीप पाटील (वय 28) या दोघांची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित, फिर्यादी आणि आरोपी हे गडहिंग्लज येथील आहेत. त्यामुळे एकमेकांना चांगले ओळखतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अविनाश पाटील याच्याकडून फिर्यादी निखिल याचा मित्र संदीप पाटील याने उसने पैसे घेतले होते. हे पैसे तो परत देत नव्हता. पुण्यात तो कोठे राहतो हे देखील आरोपींना माहिती नव्हते. त्याचा काही संपर्क होत नसल्याने त्यांनी दमबाजी करून कोल्हापूर येथील प्रभात तोडकर याला येथे बोलावून घेतले. तोही सध्या नऱ्हेत राहत होता. तो कोल्हापूरवरून पुण्यात आल्यानंतर त्यांनी संदीप पाटील याच्याबाबत चौकशी केली. पण, प्रभातला त्याच्याबाबत जास्त काही माहिती नव्हती. तो कोथरुड भागात राहतो इतकेच माहिती होते. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला घर दाखवण्यासाठी म्हणून गाडीत बसवले व वाकड भागात नेले. त्याठिकाणी अजित राऊत याला बोलावले.
याच परिसरात या दोघांना एका फ्लॅटमध्ये कोंडून ठेवले व त्यांना बेदम मारहाण केली. एकच्या डोक्यात बिअरची बाटली घातली.
तर दुसऱ्याला गुडघ्यावर मारहाण केली. तसेच त्यांनी संदीप पाटीलला याठिकाणी बोलावून घेण्याची मागणी केली.
तर फिर्यादी याला फोनकरून 10 लाख रुपयांची खंडणी मागितली.

Modi Cabinet Expansion | मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापुर्वीच मोठी खळबळ ! केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा राजीनामा

या सर्व प्रकारानंतर फिर्यादी निखिल हा सिंहगड रोड पोलीस ठाण्यात रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आला. त्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे,
उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ व त्यांच्या पथकाने साडे दहापासून या प्रकरणी तपास सुरू केला.
त्यांनी निखिलला आरोपींना फोन करण्यास सांगत पैसे घेऊन येतो, असे सांगण्यास सांगितले.
त्यानंतर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी वाकड भागात या दोघांना पकडले.
त्यावेळी आरोपींनी या दोघांना बेदम मारहाण करत एका रिक्षात बसवल्याचे दिसून आले.
त्यानंतर त्यांची सुटका करत दोघांना अटक केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

त्यांना न्यायालयात हजर केले असता 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संदीप पाटील यांच्या सांगण्यानुसार 22 लाख रुपये घेतले होते.
तर अविनाश याने 40 लाख रुपये संदीपला दिले असल्याचे सांगत आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
निखिल हा जॉबच्या शोधात आहे. तर प्रभात याचे फॅब्रिकेशनचे दुकान आहे.
दोघे एकाच फ्लॅटमध्ये राहतात.

Web Title : Pune Crime News | pune kidnapping news the two were abducted and beaten in a money transaction sinhagad road police arrested the accused from kolhapur

Related Posts