IMPIMP

PMC Medical College Pune | पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात यावर्षीपासून प्रवेश सुरु

by nagesh
 Pune PMC News | Only 1 thousand 734 acacia, subabhali trees will be removed in the river bank improvement plan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPMC Medical College Pune | पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट (PMC Medical Education Trust) संचलित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College, Pune) यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (Academic Year) प्रवेश सुरु करण्यात येणार आहेत. पहिल्या वर्षी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश (Admission) दिला जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्फे (Department of Medical Education and Medicine) ही मंजुरी दिली आहे. (PMC Medical College Pune)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी (PMC Medical College Pune) आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत.
त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश सुरु केले जाणार आहेत. यंदाच्या वर्षी 100 विद्यार्थ्यांना (Student) प्रवेश देऊन प्रत्यक्ष शिक्षण सुरु होणार आहे. महापालिकेने धर्मादाय आयुक्त (Charity Commissioner) कार्यालयाकडे नोंदणी करुन ट्रस्टच्या माध्यामातून हे वैद्यकीय महाविद्यालय सुरु आहे.

 

या ट्रस्टवर महापौरांसह (Pune Mayor) पालिकेतील पदाधिकारी आणि गटनेत्यांचाही समावेश आहे.
दरम्यान, डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या (Dr. Naidu Infectious Diseases Hospital) जागेवर महाविद्यालयाची अद्ययावत इमारत उभारली जाणार आहे.
यासाठी 650 कोटी रुपये एवढा खर्च महापालिका करणार आहे.
याशिवाय सध्या कमला नेहरु रुग्णालय (Kamala Nehru Hospital, Pune),
बाबूराव सणस कन्याशाळा (Baburao Sanas Girls School, Pune) येथे वर्गखोल्या तयार केल्या असून,
त्याठिकाणी शिक्षणाची सोय केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

केंद्र शासन (Central Government), भारतीय आयुर्विज्ञान परिषद, नवी दिल्ली (Indian Council of Medical Sciences, New Delhi) व राज्य शासन (State Government) यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबत नियमांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे.
शासकीय वैद्यकीय किंवा तत्सम महाविद्यालयातील कोणत्याही अध्यापकास तो सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होईपर्यंत संस्थेमध्ये नोकरी देता येणार नाही किंवा त्याच्या सेवा संस्थेस वापरता येणार नाहीत.
संस्थेने कोणत्याही परिस्थितीत शासनाने मान्य केलेल्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश करण्यात येऊ नयेत, असे नमूद केले आहे.

 

Web Title :- PMC Medical College Pune | admission in bharat ratna atal bihari vajpayee medical college pune starts from this year

 

हे देखील वाचा :

Gastric Problem | वारंवार पोट फुगण्याच्या आणि गॅसच्या समस्येने त्रस्त आहात का? जाणून घ्या याची 4 कारणे, 8 लक्षणे आणि बचावाच्या 10 पद्धती

Pune Crime | धक्कादायक ! मुलीला त्रास दिल्याच्या आरोपावरुन तरुणाला कोंडून बेदम मारहाण, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Pune Navale Bridge Accident | नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरुच, भरधाव ट्रकचा भीषण अपघात, एक ठार तर एक जखमी

 

Related Posts