IMPIMP

Pune Crime | पुण्यातील ‘मटका किंग’ची ‘गेम’ करणारे 6 जण ‘गोत्यात’, खूनाचं कारण आलं समोर

by nagesh
Pune Crime | Damage to houses due to rock blasts due to mine blast for riverine wells; The water tank burst in the incident in Kharadi, some people were injured due to stones

पुणे / शिरवळ : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील कात्रज (Katraj) परिसरातील मटका व्यावसायिकाच्या (Matka King) डोक्यात गोळी झाडून खून केल्याची (Murder in Shirwal) धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली होती. संजय सुभाष पाटोळे Sanjay Subhash Patole (वय – 36 रा. बिबवेवाडी – Bibvewadi) असे खून झालेल्या मटका व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना खंडाळा (Khandala) तालुक्यातील शिरवळ (shirwal) येथील फुलमळा परिसरातील लेक पॅलेस (Lake Palace) या इमारतीच्या टेरेसवर घडली होती. मृत मटका किंगच्या खिशातील हॉटेलच्या बिलावरुन (Hotel Bill) शिरवळ पोलिसांनी (Shirwal Police) खूनाचा उलगडा (Pune Crime) केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक (Arrest) केली आहे. आर्थिक वादातून हा खून (Brutal Murder) केल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तरबेज मेहमूद सुतार Tarbej Mehmood Sutar (वय – 31 कात्रज, पुणे), किरण बबनराव साळुंखे Kiran Babanrao Salunkhe (आंबेगाव – Ambegaon), विकी राजेंद्र जाधव Vicky Rajendra Jadhav (वानवडी – Wanwadi), शंकर उर्फ तात्या आश्रुबा पारवे Shankar alias Tatya Ashruba Parve (बिबवेवाडी), नितीश उर्फ रित्या सतीश पतंगे Nitish alias Ritya Satish Patange (बिबवेवाडी) आणि राकेश सुरेश गायकवाड Rakesh Suresh Gaikwad (पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून सर्व आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सर्व आरोपींना शिरवळ पोलीस ठाण्यात (Shirwal police station) आणले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. (Pune Crime)

 

मृत संजय पाटोळे आणि मुख्य सूत्रधार यांच्यामध्ये आर्थिक देवाण – घेवाण आणि जमिनीच्या कारणावरुन वाद होते. दोघांनीही एकमेकांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली होती. याच कारणावरुन आरोपी तरबेज याने आपल्या साथिदारांच्या मदतीने संजय याचा खून केला. आरोपींनी संजय याच्या डोक्यात गोळी झाडून (Firing) खून केला. मात्र शवविच्छेदन अहवालात मृताच्या डोक्यात गोळी आढळून आली नाही. गोळी मृताच्या नाकातून आरपार निघून बाजूच्याच एका ओढ्यात पडली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हॉटेलच्या बिलावरुन उलगडलं गूढ
संजय पाटोळे याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी पंचनामा करताना पोलिसांना मृताच्या खिशात एका हॉटेलच्या बिलाची पावती मिळाली.
त्यानुसार पोलिसांच्या पथकाने हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्ही (CCTV) तपासले.
त्यावेळी मृत संजय याच्यासोबत काही आरोपी जेवण करताना दिसून आले.
त्यातील एक सराईत गुन्हेगार असल्याचे समजलं. त्यानुसार पोलिसांनी पुण्यातील विविध भागातून आरोपींना अटक केली.

 

Web Title :- Pune Crime | pune katraj matka king Sanjay Subhash Patole shot dead in khandala taluka 6 accused arrested by shirwal police

 

हे देखील वाचा :

MP Supriya Sule | प्राईम पॉईंट फौंडेशनचा संसदरत्न पुरस्कार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्या वर्षी जाहीर

Radiotherapy | आता कर्करोगावरील अत्याधुनिक उपचाराने हृदयविकारही बरा होणार; जाणून घ्या कसे

Nitesh Rane | दिशा सॅलियनला घरी सोडणारी कार सचिन वाझेची? भाजप नेत्याच्या दाव्याने सर्वत्र उडाली खळबळ

 

Related Posts