IMPIMP

Pune Police Mundhwa News | मुंढवा-केशवनगरमधील परिस्थिती चिंताजनक?, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘एक्सटेन्शन’च्या ‘जुगाड’मध्ये

by nagesh
Pune Police Mundhwa News | Situation in Mundhwa-Keshavnagar alarming?, Senior Police Inspector trying to Extension for transfer

पुणे : नितीन पाटील : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Mundhwa News | मुंढवा आणि केशवनगर (Keshav Nagar) परिसरातील गेल्या काही दिवसांपासुन गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. दि. 30 एप्रिल रोजी केशवनगरमधील गुरूकृपा सोसायटीजवळ एका निष्पाप ज्येष्ठ नागरिकाचा गुन्हेगारांनी केवळ नशा करताना हटकल्यामुळे धारदार हत्याराने वार करून खून (Murder In Pune) केला. या घटनेला काही दिवस झाले नाही तोवर केशवनगर परिसरातील लोणकर चौकात (Lonkar Chowk, Keshav Nagar, Pune) एका पान शॉप चालकावर गुन्हेगारी वृत्तीच्या तिघांनी धारदार हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केले. मुंढवा पोलिस स्टेशनच्या (Mundhwa Police Station) हद्दीतील परिस्थिती चिंताजनक बनली असतानाच तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Senior Police Inspector) एक्सटेन्शनचा (Extension For Transfer) ‘जुगाड’ (Jugad) करण्यात मग्न असल्याची चर्चा सध्या पोलिस वर्तुळामध्ये आहे. हद्दीमधील गुन्हेगारांवर (Criminals In Pune) स्थानिक पोलिसांचा वचक कमी होत असल्यामुळे एका निष्पाप ज्येष्ठ नागरिकाचा खून झाल्याचे चित्र पहावयास मिळते. (Pune Police Mundhwa News )

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दि. 30 एप्रिल 2023 रोजी भरदुपारी म्हणजेच 3 ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास काही गुन्हेगारी वृत्तीचे युवक गायकवाड वस्ती येथील रविंद्र गायकवाड Ravindra Gaikwad (60) यांच्या घराजवळ व गोठया जवळ नशा करत बसले होते. त्यांना गायकवाड यांनी हटकले असता युवकांनी थेट त्यांच्यावर हल्ला चढविला. युवकांनी गायकवाड यांच्या डोक्यात आणि पाठीवर कोयत्याने सपासप वार केले आणि दगडाने मारहाण करून त्यांचा खून केला. रवींद्र गायकवाड यांनी केवळ येथे नशा करत का बसलात याबाबत युवकांना हटकले होते आणि त्यांनी निष्पाप रवींद्र गायकवाड यांचा थेट खून केला. त्यानंतर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांनी गायकवाड यांच्या खून प्रकरणी काही जणांना अटक देखील केली. (Pune Police Mundhwa News )

 

स्थानिक नागरिकांनी दि. 1 मे रोजी परिसरात कडकडीत बंद ठेवला आणि एकप्रकारे स्थानिक पोलिसांना गुन्हेगारीवर आवर घालण्यासाठी इशारा दिला.
मात्र, त्याचा कसलाही परिणाम मुंढवा पोलिसांवर झालेला दिसत नाही.
मुंढवा, केशवनगर, लोणकर चौक आणि इतर भागात गुन्हेगारी वृत्तीचे लोक सर्‍हास लोखंडी हत्यारे घेवून फिरतात असे स्थानिकांकडून सांगितले जाते.
गायकवाड यांचा खून होऊन् 4 दिवस झाले नाहीत तोवर दि. 3 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अदी कदम,
प्रशांत कांबळे आणि त्यांच्या साथीदाराने लोखंडी हत्याराने पान शॉप चालक सिताराम अशोक साठे (21) याच्यावर हल्ला चढविला.

 

केशवनगरमध्ये भर दुपारी एका निष्पाप ज्येष्ठ नागरिकाचा खून होतो. त्यानंतर चार दिवसांमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता
पान शॉप चालकावर लोखंडी हत्याराने हल्ला होतो. ही परिस्थिती चिंताजनक आहे.
यावरून स्थानिक पोलिसांचा हद्दीतील वचक कमी झाल्याचे समोर येते.

 

मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटना घडत असताना पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलस निरीक्षक
मात्र सर्वसाधारण बदल्यांमध्ये आपला नंबर लागू नये म्हणून एक्सटेन्शनचा ‘जुगाड’ करण्यात मग्न असल्याची चर्चा पोलिस वर्तुळामध्ये आहे.
त्यांनी एक्सटेन्शनसाठी डीजी ऑफिसच्या पायर्‍या देखील काही वेळा झिजवल्या असल्याची चर्चा सध्या आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतर देखील त्यांची परवड होत नसेल तर कायदा व सुव्यस्थेची मुंढवा-केशवनगरमधील परिस्थिती काय
असेल याचा अंदाज करणे अशक्यच. स्थानिक पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा,
परिसरातील गुन्हेगारी घटनांना आवार घालावा अशी मागणी स्थानिकांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
एवढेच नव्हे तर स्थानिक नागरिकांनी पोलीसनामा ऑनलाइनच्या प्रतिनिधीशी बातचीत करताना परिसरातील नेमकी काय परिस्थिती सुरू आहे
याबाबत सविस्तरपणे सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील
मुंढवा-केशवनगर परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 

‘एक्सटेन्शन’ (मुदतवाढ) कशासाठी

पोलिस आयुक्तालयात 6 वर्षाचा कार्यकाल पुर्ण झाल्यानंतर पोलिस निरीक्षकांची आयुक्तालयाच्या बाहेर बदली होते.
मात्र, 6 वर्ष पुर्ण होत असतानाच ‘क्रीम पोस्टींग’ मिळालेले काही पोलिस निरीक्षक आणखी एक वर्षासाठी
आयुक्तालयातच राहण्यासाठी एक्सटेन्शन (मुदतवाढ) मिळविण्यासाठी प्रयत्नीशील असतात. त्यासाठी ते डीजी ऑफिसच्या
(DG Office Mumbai) पायर्‍या देखील झिजवून पुण्याई खर्च करतात.
कारण, 25-30 च्या ‘मन्थली मीटर’वर त्यांचा मोह असतो. त्यामुळे काही पोलिस निरीक्षक एक्सटेन्शनसाठी डीजी ऑफिसच्या पायर्‍या झिजवतात.

 

 

Web Title :- Pune Police Mundhwa News | Situation in Mundhwa-Keshavnagar alarming?,
Senior Police Inspector trying to Extension for transfer

 

हे देखील वाचा :

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद 13 वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा ! 30 यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ए.के. स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी

Bhor Lok Nyayalaya | भोर येथे 11 मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन

Chandrakant Patil – Pune News | स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 

Related Posts