IMPIMP

E-Pass l पुण्यातून ‘या’ 8 जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यकच – पुणे पोलीस

by omkar
E Pass

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – (E-Pass)राज्यात आजपासून अनलॉक सुरु होत आहे. शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्ही दर आणि ऑक्सिजन बेड वापराचे प्रमाण यावर त्यांची पाच गटात विभागणी केली आहे.
त्याचवेळी त्यात आंतर जिल्हा प्रवासाबाबतचे नियम ठरवून दिले आहे.त्यात ई पासची आवश्यकता केवळ ५ व्या गटासाठी केल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र, काही जिल्ह्यांनी ४ थ्या गटातील ८ जिल्ह्यातही प्रवास करायचा असेल तर, ई पास E-Pass लागेल, असे सांगितल्याने प्रवास करण्यासाठी इच्छुक असणार्‍यांमध्ये विशेषत: स्वत:च्या वाहनांनी जाणार्‍यांमध्ये संभ्रम अन गोंधळ निर्माण झाला आहे.

दुसर्‍यांदा पिता बनला प्रिन्स हॅरी, पत्नी मेगन मर्केलनं दिला गोंडस मुलीला जन्म, ‘लिली डायना’ ठेवलं नाव

याबाबत आज पुन्हा खात्री करुन निर्णय घेणार असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.
त्याचबरोबर पुण्यासह सर्व प्रमुख शहरांमध्ये सायंकाळी ५ वाजल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे.
तसेच प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात येऊन विनाकारण बाहेर फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

या संचारबंदीमुळेही बाहेरगावाहून येणार्‍या वाहनांना शहरात येण्यास सायंकाळी ५ वाजून गेले तर त्यांची अडवून होणार का अशी शंका प्रवाशांच्या मनात कायम आहेत. राज्य शासनाने तयार केलेल्या नियमावलीत पाचव्या गटातील  जिल्ह्यात जाण्यासाठी ई पास बंधनकारक केला असून त्यात अत्यावश्यक कारणासाठीच ई पास दिला जाणार आहे.
मात्र, सध्या तरी कोणताच जिल्हा ५ व्या गटात नाही.

पुणे शहर पोलिसांनी मात्र गट ४ मधील शहरात जाण्यासाठी ई पास लागणार असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे या गटातील सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, बुलडाणा, सोलापूर, सिंधुदुर्ग या ८ जिल्ह्यांसाठी ई पास लागणार असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे अनेक प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना विचारले असता त्यांनी आज खात्री करुन त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

याचवेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी
-खासगी वाहने आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवास करणारे प्रवासी पाचव्या गटात समावेश असलेल्या जिल्ह्यात जाणार असल्यास ई पास E-Pass बंधनकारक आहे, असे सांगितले.

पुणे शहर व पिंपरी चिंचवड हे तिसर्‍या गटात आहेत तर पुणे जिल्हा हा चौथ्या गटात आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील बंधनामध्ये फरक आहे.
एसटी तसेच खासगी ट्रॅव्हलमार्फत प्रवास करणार्‍यांना ई पासची आवश्यकता नाही.

Also Read:- 

जाणून घ्या 7 जूनचे राशीफळ; ‘या’ 4 राशींसाठी उघडतील प्रगतीचे नवे मार्ग

Video : छत्रपती संभाजीराजेंचा रायगडावरून इशारा, म्हणाले – ‘मी मेलो तरी चालेल पण, समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही’

‘आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे…’, खा. संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; ‘या’ तारखेला निघणार पहिला मोर्चा (व्हिडीओ)

‘…उत्सुकतेपोटी माझ्या अंगावर तेव्हाही काटा आला होता, आज लिहितानाही येतो’ – जयंत पाटील

पुणे तिथं काय उणे ! 83 वर्षाचं म्हातारं अन् 70 व 65 वर्षांची म्हातारी चक्क करत होते गांजाची तस्करी; पोलिसांच्या छाप्यात 4 किलो गांजा जप्त

Pune Crime News : पुण्यात 27 वर्षीय इंजिनीअर पतीचा 19 वर्षीय पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केला खून; ‘कोरोना’ काळाचा घेतला फायदा, लोणीकाळभोर परिसरातील घटना

 

Related Posts