IMPIMP

Pune Crime | पुण्यातील बिबवेवाडीमध्ये 14 वर्षाच्या मुलीचा खून झाल्यानंतर कुटुंबियांनी गृहमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी

by nagesh
Pune Crime | After the murder of a 14-year-old girl in Bibvewadi in Pune, the family made a big demand to the Home Minister dilip walse patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या (Bibvewadi Police Station) हद्दीत इयत्ता 8 वीमध्ये शिकणाऱ्या कबड्डी खेळाडू मुलीचा कोयत्याने वार (Pune Crime) करत खुन केला गेला. क्षितिजा अनंत व्यवहारे असं खून (Murder) झालेल्या मुलीचं नाव आहे. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक (Arrested) करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी ऋषिकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत (Rishikesh alias Shubham Bajirao Bhagwat) या मुख्य आरोपीसह तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतलं होतं. यानंतर आज (मंगळवारी) क्षितिजा व्यवहारे यांच्या कुटुंबीयांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना निवेदन दिले आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्त केले आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, सदरच्या खुनाचा खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व विशेष सरकारी वकील म्हणून कुटुंबियांच्या वतीने हेमंत देवराम झंजाड यांची महाराष्ट्र सरकारतर्फे नियुक्ती करावी. तसेच मुलीच्या कुटुंबियांना आरोपीपासून जीविताला धोका आहे. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी देखील मागणी त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून (Pune Crime) केली आहे.

 

काय आहे प्रकरण?

क्षितिजा अनंत व्यवहारे (वय,14) ही एक कबड्डीपटू होती. सायंकाळी ती मित्र मैत्रिणी सोबत कबड्डीचा सराव करत होती.
ज्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या एका तरुणाने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली.
यादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने आरोपीने क्षितिजाच्या गळ्यावर सपासप वार केले.
गंभीर जखमी झालेल्या क्षितीजाचा जागेवरच मृत्यू झाला.
त्यानंतर त्याने घटनास्थळीच कोयता आणि सोबत आणले शस्त्र टाकून देऊन पसार झाला.
एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला होता. त्यानंतर मुख्य आरोपीसह तीन अल्पवयीन मुलांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

 

Web Title :- Pune Crime | After the murder of a 14-year-old girl in Bibvewadi in Pune, the family made a big demand to the Home Minister dilip walse patil

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | ‘ठाकरे सरकारची माफियागिरी, मलिक वानखेडेंना मुस्लिम म्हणतात तर मुश्रीफ….’

Kranti Redkar | वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांचा नवाब मलिकांवर पलटवार, म्हणाल्या – आरोप चोमडेपणासारखे, किचन पॉलिटिक्समधून बाहेर या

Mumbai Drug Case | वानखेडेंवर मलिकांचा लेटर बॉम्ब, स्पेशल 26 बाबत केला गोप्यस्फोट; जाणून घ्या पत्रात?

 

Related Posts