IMPIMP

Pune Crime | गैरसमजातून दुकान पेटवून देणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल; हडपसर परिसरातील घटना

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीने मोटारसायकल जप्त केली. तरुणाने सांगितल्यामुळे कंपनीने गाडी नेली असा गैरसमज करुन चौघांनी हडपसर (Hadapsar) भाजी मंडईतील दुकानाला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत भाजीपाला व फळाचे दोन दुकाने तसेच शेजारील तीन दुकानांचे नुकसान झाले आहे. (Pune Crime)

याप्रकरणी मयुर किसन फडतरे (वय ३२, रा. रामोशी आळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन राज चौधरी, रौफ बागवान, अर्जुन ऊर्फ टोण्या व फैज्या आणि बागवान लातुरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी राज चौधरी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. राज चौधरी याने मयुर याच्या नावावर एक मोटारसायकल खरेदी केली. मात्र, त्याने हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीने त्यांची मोटारसायकल नेली होती. परंतु, आरोपी यांना फिर्यादी यांनीच फायनान्सवाल्यांना गाडी दिली असल्याचा गैरसमज झाला. त्यांनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून फिर्यादी याला तुझी वाट लावतो, अशी धमकी दिली होती. फिर्यादी यांचे हडपसर भाजी मंडई (Hadapsar Mandai) येथे भाजीपाला व फळाचे दोन दुकाने आहेत. आरोपींनी त्या दुकानांना ३१ जानेवारी रोजी रात्री आग लावली. त्यात त्यांच्या दोन दुकानांबरोबर शेजारील चंद्रकला गवळी, अक्षय भिसे व धोंडाबाई पांढरे यांच्या दुकानाला आग लागली. त्यात ६० हजार रुपयांचे नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Pune Crime | Charges filed against four persons for setting shop on fire due to misunderstanding; Incidents in Hadapsar area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या भोसरीमध्ये लातूरच्या युवकाचा दगडाने ठेचून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गॅरेजमध्ये दिला फेकून, परिसरात खळबळ

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | अ‍ॅन्टी करप्शनने परमबीर सिंह यांची केली 2 तास चौकशी; पोलीस निरीक्षक अनुप डांगे प्रकरणात नोंदविला जबाब

Corporator Keshav Gholve | खंडणी प्रकरणी माजी उपमहापौर आणि भाजपाचे विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना मध्यरात्री अटक

 

Related Posts