IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या लोणी काळभोर परिसरातील सराईत गुन्हेगार राज रविंद्र पवार दोन वर्षासाठी तडीपार

by nagesh
Pune Crime | Raj Ravindra Pawar, a notorious criminal from Loni Kalbhor area of Pune, was deported for two years

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरातील गुन्हेगारांवर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यातील लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राज रविंद्र पवार Raj Ravindra Pawar (वय-24 रा. कवडीपाट टोल नाका, कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर) याला दोन वर्षांसाठी पुणे (Pune Crime) आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार (Tadipar) करण्यात आले आहे. आरोपीच्या तडीपारीचे आदेश पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी मंगळवारी (दि.7) दिले आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आरोपी राज पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या इतर साथिदारांच्या मदतीने लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन परिसरात दहशत निर्माण करुन गुन्हे केले आहेत. तसेच आरोपीने लोणी काळभोर आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत वारंवार गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिक त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. (Pune Crime)

 

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे (Loni Kalbhor Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांनी आरोपी राज पवार याचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठवला होता. प्रस्तावाची पडताळणी करुन मंगळवारी आरोपी राज पवार याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपर करण्याचे आदेश देण्यात आले.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale),
पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे (PSI Amit Gore), पोलीस अंमलदार गणेश सातपुते, संदिप धनवटे, मल्हारी ढमढेरे यांनी केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Pune Crime | Raj Ravindra Pawar, a notorious criminal from Loni Kalbhor area of Pune, was deported for two years

 

हे देखील वाचा :

Pune Crime | माचिस न दिल्याने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; पुण्याच्या कॅम्प परिसरातील घटना

Chandrakant Patil | ‘2024 मध्ये BJP लोकसभेत 418 जागांच्या खाली येणारच नाही’ – चंद्रकांत पाटील

Udayanraje Bhosale | खा. उदयनराजे भाजपलाही नकोसे?; सातारा जिल्हाध्यक्षांच्या विधानामुळं चर्चेला उधाण

 

Related Posts