IMPIMP

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक; 1 पिस्टल 2 काडतुस जप्त

by nagesh
Pune Crime | pimpri chinchwad women policemen were molested in a rickshaw pune crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | विनापरवाना पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या एका तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road News) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक पिस्टल (pistol) आणि दोन जिवंत काडतुसे (Live Cartridge) असा एकूण 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) नवले ब्रीज (navale bridge pune) जवळील हॉटेल डेक्कन पॅव्हिलियन (hotel deccan pavilion) जवळ करण्यात आली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

प्रशांत उर्फ बाळा सुरेश कांबळे (वय-24 रा. बाबु भंडारी चौक, आनंदनगर, चिंचवड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील (Sinhagad Road Police Station) तपास पथकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शंकर कुंभार (Shankar Kumbhar) व उज्जवल मोकाशी (Ujwal Mokashi) यांना माहिती मिळाली की, नवले ब्रीज जवळील हॉटेल डेक्कन पॅव्हिलियन येथे एक तरुण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली.

 

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलीस आल्याचे पाहून आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुन व खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे दाखल आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपआयुक्त परीमंडळ 3 पोर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad),
सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग सुनिल पवार (ACP Sunil Pawar),
वरीष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ शेख (Senior Police Inspector Yusuf Shaikh)
पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare)
यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले (API Chetan Thorbole),
पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ (PSI Kuldeep Sankapal), पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी,
शंकर कुंभार, अमेय रसाळ, किशोर शिंदे, देवा चव्हाण, सागर भोसले, इंद्रजित जगताप, सुहास मोरे, अमोल पाटील, विकास बांदल यांचे पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Sinhagad Road Police arrest youth carrying unlicensed pistol; 1 pistol 2 cartridges seized

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणार्‍याला बंगळुरूमधून अटक, समोर आलं सुशांतसिंग ‘कनेक्शन’

Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना ! पैशाच्या देण्या-घेण्यातून तिघांनी जीवलग मित्राची केली निर्घृण हत्या

Satara Crime | मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने 22 वर्षीय महिलेवर बलात्कार

 

Related Posts